Traffic Management : साडेपाच लाख लोकसंख्येसाठी 67 वाहतूक पोलिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Police

Traffic Management : साडेपाच लाख लोकसंख्येसाठी 67 वाहतूक पोलिस

जळगाव : साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरात रोज हजारो वाहने रस्त्यावर उतरतात. प्रत्येक कुटुंबात तीन ते चार वाहने आहेत. त्यापैकी किमान तीन रस्त्यावर असतात. मात्र, साडेपाच लाख लोकसंख्येच्या वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ ६७ पोलिस कर्मचारी आहेत.

वरकमाईतून हिस्सा द्यावा लागतो, म्हणून १५ वॉर्डन बॉइजची सोईस्कररित्या गच्छंती केली असून, बेकायदेशीर वॉर्डनच वाहतूक पोलिसांचे हप्ते गोळा करण्यासाठी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक नियंत्रण पोलिस यंत्रणा सध्या वेगळ्याच कामात गुंतल्याने शहर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

जळगाव शहरात मोजके चार ते पाच चौक सोडले, तर संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळित झाली आहे. सर्वच चौकांमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. हॉकर्स, बेशिस्त पार्किंगने रस्ते अक्षरश: गुदमरून गेले असून, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, नेहमीचे अपघात डोकेदुखी ठरू लागली आहे. (Sixty Seven traffic police for a population of five and a half lakhs Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : कसबे सुकेणेत शेतीला पुदिना पिकाचा पर्याय; पुदिना पिकाचे शेकडो एकरवर क्षेत्र!

तीन-चार महिन्यांत शहरातील विविध चौकांत झालेल्या अपघातांमध्ये पाच निष्पाप जिवांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील १९ चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था बसविली आहे. मात्र, पोलिस बोटावर मोजण्याइतक्याच चौकात आढळून येतात. शहरात ट्रॅफिक ऑफिससमोरील बसस्थानकाला अनधिकृत प्रवासी वाहतुकदारांचा गराडा घातलेला असतो. रिक्षाचालकांनी बसस्थानकाचे दोन्ही गेट कब्जात घेल्याची स्थिती असते.

बेंडाळे महाविद्यालयासमोर चार वाहतूक पोलिस शाळा सुटण्याच्या वेळेस असायचे. आता ‘राम भरोसे’ अशी परिस्थिती आहे. न्यायालय चौकातच दोन्ही कॉम्प्लेक्सची पार्किंग रस्त्यावरच आहे. तशीच परिस्थिती थेट गणेश कॉलनीपर्यंत आहे.

मार्केट व त्याच्या पार्किंगचा विषय महापालिकेचा आहे. आमदार लता सोनवणे यांच्या निवासस्थानापासून ते थेट चित्रा चौकापर्यंत चालणेही अशक्य आहे. आमदार सोनवणे यांच्याकडे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक इफ्तेखार सय्यद सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. अजिंठा चौक ते चित्रा चौक, जुने बसस्थानक, टॉवरपर्यंत पूर्णतः वाहतूक विस्कळित असते. टॉवर चौक ते शनिपेठपर्यंत दुचाकीवर जाणेही एखाद्या शिक्षेसमान आहे. संपूर्ण शहर वाहतुकीच्या विळख्यात सापडले असताना, वाहतूक पोलिस रस्त्यांवरून बेपत्ता झाले आहेत.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik Highway Accident : माझी पत्नी व मुलगी कुठे आहेत, दाखवा ना!

अपघातस्थळे लावारीस

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दूरदर्शन टॉवर, खेडी पेट्रोलपंप, कालिंकामाता मंदिर, अंजिठा चौक ते रिलायन्स पेट्रोलपंपापर्यंतचा भाग, नवीन पूल झाल्याने आकाशवाणीचा भाग मोकळा असून, चौकात प्रवासी वाहतूकदारांचा प्रचंड उपद्रव आहे.

अपघाताला निमंत्रण देणारे हे ठिकाण आहे. शिवकॉलनी स्टॉप, गुजराल पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालील दोन्ही चौक, खोटेनगर स्टापपर्यंत वाहतूक कोंडीचे स्पॉट आहेत. मात्र, अपघातप्रणव ठिकाण म्हणूनही या जागांची ओळख बनू पाहत आहेत. पोलिसांच्या मनुष्यबळ तुटवड्यामुळे वाहतूक पोलिस चुकून एखाद्या वेळेस या जागांवर दिसले, तर वाहनधारकांचे नशिब, अन्यथा लावारीस चौकांत अपघात ठरलेच आहेत.

मंजूर संख्याबळ ९०, पण

वाहतूक शाखेची पोस्ट पनीशमेंट पोस्टिंग असल्याने प्रभारी अधिकारीही या शाखेसाठी भेटेना, अशी अवस्था आहे. निरीक्षक लिलाधर कानडे यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्यासोबतच वाहतूक शाखेचा पदभार असल्याने या विधानाची सत्यता उघड होते. वाहतूक शाखेची स्थापना झाल्यापासून मंजूर संख्याबळ ९० आहे.

मात्र, ६७ कर्मचारीच कामावर आहेत. केवळ जामनेरचा प्रभाव म्हणून या ठिकाणी नियुक्त काही टगे कर्मचाऱ्यांमुळे नव्याने बदली होऊन येणाऱ्यांचा स्पष्ट नकार असतो. वाहतूक शाखा सोडून गेलेले कर्मचारीही सध्या वसुलीची कामे करीत असल्याचे समजते, तर काहींनी थेट वाळू व्यवसायात जम बसविल्याचे बोलले जात आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना टगेगिरी करणारे पोलिस कामच करू देत नसल्याने वाहतूक शाखेची पुरती दैनावस्था झाली आहे.

हेही वाचा: Nashik News : ABB मध्ये 24 हजाराची पगारवाढ! मकर संक्रांतीची गोड भेट

वॉर्डन हकलले कोणी?

पोलिस होऊ न शकलेले आणि पोलिस कुटुंबाशी निगडित तरुणांना तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी वाहतुकीसाठी वॉर्डन म्हणून समावून घेतले. त्यांचे मानधन महापालिकेने देण्याची तरतूद केली होती. साधारण १५ वर्षे ही मंडळी इमाने इतबारे काम करीत होती. मात्र, महापालिचे मानधन बंद झाल्याने काही सामाजिक संस्थांच्या मदतीवर त्यांची गुजराण सुरू होती. मात्र, अचानक वॉर्डनबाईजला टार्गेट करण्यात आले.

तत्कालीन पोलिस निरीक्षक देविदास कुनगर असताना, जामनेर तालुक्याचा प्रभाव असलेले पोलिसदादा आणि वाळूमाफियांचे हस्तक असलेल्या कर्मचाऱ्यांनी वॉर्डन बॉईज यांचा ठरवून गेम केला. कुनगर यांना हाताशी धरून तत्काली पोलिस अधीक्षकांना रिपोर्ट पाठवायला लावून अचानक १५ वॉर्डन घरी पाठविण्यात आले. त्यापैकी काही वॉर्डन काही पोलिस दादांसाठी वसुलीचे काम करीत आहेत. मालधक्का, वाळू व्यवसाय, दाणा बाजार, जुने बसस्थानक परिसरातून जबरी वसुलीसाठी साध्या वेशातील वार्डन वसुली करीत असल्याच्या तक्रारी आहेत.

मंजूर संख्याबळ : ९०

हजर : ६७ (महिला ८)

अधिकारी : १ प्रभारी

सहाय्यक निरीक्षक : १

उपनिरीक्षक : १

हेही वाचा: Nashik News: यंदा व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळेतच प्रवेश; CET परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर