खानदेशात प्रथमच फोस्टनन मांजऱ्या सापाची नोंद !

भूषण श्रीखंडे
Thursday, 21 January 2021

फोस्टनन मांजऱ्या जातीचा हा साप खानदेशात प्रथमच नोंद चोपडा येथे नोंद झाली असल्याचे वन्य प्राणी अभ्यासकांनी सांगितले.  

चोपडा : शहराती समाजकार्य महाविद्यालयात पश्चिम घाटात आढळणारा सर्प आढळून आला आहे. सर्पमित्रांनी त्याला पकडून त्याच्या अधिवासात सुरक्षीत सोडले आहे. फोस्टनन मांजऱ्या (Boiga forsteni) जातीचा हा सर्प असून खानदेशात प्रथमच आढळला असल्याची मत वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे. 

आवर्जून वाचा- अजब सिंचन विभागाची गजब कहाणी; चौकशीसाठी नेमले त्यालाच ठरविले दोषी अन्‌ साक्षीदार 
 

चोपडा शहरातील भगिनी मंडळ चोपडा सांचालीत, समाजकार्य महाविद्यालयात हा फोस्टनन मांजऱ्या जातीचा साप आढळून आला. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. ईश्वर एम. सौंदाणकर यांनी तत्काळ भ्रमणध्वणीद्वारे चोपडा शहरातील सर्पमित्र सांदीप मालचे, सागर मालचे, सागर बडगूजर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ महाविद्यालयात पोहचनू ३ ते ४ फूट लांब फोस्टनन मांजऱ्या सापाला शिताफीने पकडले.

सापाचे असे आहे वैशिष्ट
सदर सापाच्या अंगावर तपकिरी गडद रंगाच्या किंवा राखाडी रांगाच्या एकाआड एक चौकोनांची नक्षी किंवा आडवे पट्टे असतात. तसेच डोक्यावर एक गडद काळी तसेच डोळ्यापासून ते मानेपर्यंत एक काळी रेष असते. रुंद त्रिकोणी डोक्यापासनू मान वेगळी दिसते. तर मोठ्या डोळयात उभी बाहुली असते.

आवर्जून वाचा- कसं होणार जळगावच ! उड्डाणपुल अर्धा बांधला गेला, तरी पूल ‘वाय’किंवा ‘टी’आकाराचा हवा हे ठरेणा   
 

पच्छिम घाटात फोस्टनन मांजऱ्याचे अस्तित्व

छोटेपक्षी, उंदीर, पाल, सरडे हे या सापाचे अन्न असनू सदर साप निशाचर आहे. तसेच हा सर्प निमविषारी असून त्यांचे एक वैशिष्ट म्हणजे हल्ला करतांना हा फुत्कारतो. हा साप झाडावर उत्तम प्रकारे चढतो. सदर या सापाची प्रजाती पच्छिम घाटात आढळतो. .

खानदेशात प्रथमच नोंद

फोस्टनन मांजऱ्या जातीचा हा साप खानदेशात प्रथमच नोंद चोपडा येथे नोंद झाली असल्याचे वन्य प्राणी अभ्यासकांनी सांगितले.  

सापाला अधिवासात सोडले

पकडलेल्या सापाला लगेच चोपडा येथील  वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, वन्यजिव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षीत अधिवासात मुक्त करण्यात आले.यावेळी सर्पमित्र सांदीप मालचे, सागर मालचे, सागर बडगूजर, वाहन चालक बुवा तडवी उपस्थित होते.

हेही वाचा- निवडणूकीत पराभूत झाला, पण निराश नाही झाला; दुसऱ्या दिवशी न सुटणारा प्रश्न त्याने दोन तासांत सोडविला  
 

 

घरात किंवा घराच्या परिसरात तसेच शेती शिवारात साप पाहून आपणास भीती वाटते, पण त्यांना त्रास दिला नाही त्यांच्या वाटेला त्यांना जावू दिले तर सापांपासून मानव जातीला कोणता धोका नाही

-दत्तात्रय लोंढे, वनपरिक्षत्रे अधिकारी, चोपडा

 

फोस्टनन मांजऱ्या साप आपल्या खानदेशात मिळणे वन्यजीव अभ्यासक वन्य प्रेमींसाठी आनंदाचीबाब आहे. तसेच आपला खानदेश हा जैवविविधतेने समृध्द असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
- संदीप मालचे,  सर्पमित्र, चोपडा

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snak marathi news jalgaon khandesh first record boiga forsteni snak