Jalgaon News : उभ्या दुचाकीवर दुचाकीस्वार धडकला; गणपतीनगरातील गृहस्थ गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bike accident

Jalgaon News : उभ्या दुचाकीवर दुचाकीस्वार धडकला; गणपतीनगरातील गृहस्थ गंभीर

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोलपंपासमोर भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक गंभीर (Serious) झाला. (speeding two wheeler collided with another in front of Mauli petrol pump 1 was seriously injured jalgaon news)

शहरातील गणपतीनगरातील रहिवासी शरद प्रभाकर पाटील (वय ४६) शनिवार (ता. ४) दुपारी बाराला कामानिमित्त दुचाकीने नशिराबादला गेले होते. माऊली पेट्रोलपंपासमोर ते दुचाकीजवळ उभे होते. समोरून सुसाट येणाऱ्या दुचाकी (एमएच १९, डीएफ ९२४१)ने शरद पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत शरद पाटील रस्त्याच्या पलीकडे फेकले गेले. त्यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार फरारी झाला. जखमी शरद पाटील यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

याबाबत शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार गिरीश अनिल सुलक्षणे (रा. रथ चौक, जळगाव) याच्याविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अलीयार खान तपास करीत आहेत.