प्रवासात वृध्दाची अचानक प्रकृती बिघडली; मग काय, एसटी बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेली

प्रवासात वृध्दाची अचानक प्रकृती बिघडली; मग काय, एसटी बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेली
Updated on

पाचोरा : आगाराची एसटी बस मधील वृध्द प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा प्राण वाचविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातच थेट बस आणली. थेट ग्रामीण रुग्णालयात एसटी बस आल्याने सारेच अंचिबीत देखील झाले.  

प्रवासी असलेले मोतीलाल चौधरी (वय ६६, रा. धामनोद) येथून अमळनेर बसमधून प्रवास करीत असताना पाचोरा बसस्थानकावर उतरले व त्यानंतर पाचोरा बसस्थानकावरून शिंदाड जाण्यासाठी पाचोरा आगाराच्या बसमध्ये बसले होते. मोतीलाल चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे प्रवाशांनी चालक व वाहकाला सांगितले.

तरी पण वाचले नाही प्राण

प्रवासीची तब्यत अचानक बिघडल्याने एसटीचे वाहव व चालक यांनी माणूसकी व तत्परता दाखवित क्षणाचाही विलंब न लावता तसेच रुग्णवाहिकेची वाट पाहत न पाहता तत्काळ या प्रवाशाला बसमधूनच ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयातील ज्ञानेश्वर पाटील, वैशाली राठोड, अमोल मापारे, वाय. डी. पाटील यांनी मदत करीत डॉ. अमित साळुंके यांनी तपासणी केली असता रुग्णाला मृत घोषित केले. 

सारेच झाले अचंबित

एसटी बस मध्ये प्रवास करत असतांना अचानक वृध्दाची प्रकृती खराब झाली. बस चालक व वाहकाने तत्काळ प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी लालपरी (बस) प्रवासी थेट ग्रामीण रुग्णालयात आली. रुग्णालयात व रुग्णालय परिसरातील उपस्थित सारेच अचंबित झाले.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Yogesh Nemade
Marathi News Esakal
www.esakal.com