Jalgaon : दुचाकीचा धक्का लागल्याने चाकूने वार

दुचाकीचा धक्का लागल्यावरून दोन गटात हाणामारी झाली.
crime news
crime news esakal
Updated on: 

जळगाव : गेंदालाल मिल परिसरात दुचाकीचा धक्का लागल्यावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यात, एकमेकांना चाकूने वार करत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

पहिल्या तक्रारीत शेख तन्वीर शेख रहिम यांनी म्हटले आहे, की गेंदालाल मिल परिसरातून भावाच्या दुचाकीवरून शेख तन्वीर हा बुधवारी (ता. १) रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी येत असताना सरला सुरेश बर्वे या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून आकाश सुरेश बर्वे आणि गोलू सुरेश बर्वे (दोन्ही रा. रेणुका माता मंदीर, गेंदालाल मिल) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने शेख तन्वीर याच्या मांडीवर आणि पायांवर चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी आकाश सुरेश बर्वे आणि गोलू सुरेश बर्वे दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Jalgaon : गळ्यावर विळ्याने वार; पिंप्री येथील वृद्धेची हत्या

दुसऱ्या फिर्यादीत आकाश सुरेश बर्वे याने म्हटले आहे, की गेंदालाल मिल येथील रेणुका माता मंदिर परिसरातून बुधवारी (ता. १) रात्री १२.३० वाजता घरी असताना शेख तन्वीर याच्यासह इतर अनोळखी दोन जण घरात घुसून मारहाण व शिवीगाळ करून दामदाटी केली. तन्वीरच्या हातातील चाकूने गुडघ्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी आकाश बर्वे याच्या फिर्यादीवरून शेख तन्वीर याच्यासह इतर दोन जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

crime news
डिझेलटंचाई अन् भाववाढीने बळीराजा संकटात; मजूरही मिळेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com