Jalgaon Crime News : पैशांच्या वादातून धारदार शस्त्राने वार

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील जुने जळगाव कोल्हेवाडा परिसरात व्याजाच्या पैशांवरून अंगणवाडी सेविका महिलेसह चौघांना लाठ्याकाठ्यांनी हल्ला करुन तलवारीने जखमी करण्यात आले. (stabbing with sharp weapon over money dispute jalgaon crime news)

रविवारी (ता. ४) रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या हल्ल्यातील जखमींवर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्‍हा रुग्णालयात दाखल जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोल्हे वाडा या परिसरात चेतन आनंद मिस्तरी (वय-२४) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon Crime News : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

त्याच्यासोबत त्याचा भाऊ, वहिनी आणि वडील हे देखील एकाच कुटुंबात राहतात. रविवारी (ता.४) रात्री दहाच्या सुमारास व्याजाच्या पैशांच्या वादातून गल्लीत राहणाऱ्या आडदांड सावकारांनी चेतन आनंद मिस्तरी,

चेतनचे वडील अनंत मिस्तरी, भाऊ रूपेश अनंत मिस्तरी, वहिनी शुभांगी रूपेश मिस्तरी यांना लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.

यात चेतनच्या डोक्याला धारदार शस्त्राचा वार बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Crime News
Jalgaon Crime News : विवाहितेस बेदम मारहाण केल्याप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com