स्टेट बँक कर्मचाऱ्याचा असाही प्रताप; व्यापाऱ्याला 39 लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

स्टेट बँक कर्मचाऱ्याचा असाही प्रताप; व्यापाऱ्याला 39 लाखांचा गंडा

जळगाव : शहरातील जिल्हापेठ परिसरातील व्यापाऱ्याला चक्क स्टेट बँकेच्या (SBI) कर्मचाऱ्याने गुंतवणुकीचे आमिष दाखवत ३९ लाखांचा चुना लावला आहे. बँकेत व्याज कमी मिळतो असे म्हणत, जास्तीच्या व्याजाचे आमिष आणि खात्रीशीर दावा करून ही फसवणूक करण्यात आली.

विलास डोंगरलाल जैसवाल (वय-६९ रा. सागर अपार्टमेंट, जिल्हापेठ) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. स्टेट बँकेच्या महाबळ शाखेत नोकरीला असलेल्या प्रसाद सोनार यांच्याशी (ता.३० डिसेंबर २०१८ला) त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यावर प्रसादने आपल्या लाघवी बोलण्यातून जैसवाल यांच्यावर प्रभाव टाकत स्टेट बँकेत नोकरीला असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. स्टेट बँकेत व्याज व्यवस्थित मिळत नाही असे सांगून, मी सांगतो त्या ठिकाणी पैसे गुंतवा आम्हाला त्यातून १० ते १५ टक्के व्याज मिळते आणि त्यातून तुम्हाला ५ टक्के प्रतिमहिना अतिरिक्त व्याज देऊन असा प्रस्ताव ठेवला. आणि त्याच्या आमिषाला विलास जैसवाल बळी पडले.

हेही वाचा: Jalgaon : प्लॉट विक्रीचे पैसे मागणाऱ्या भाऊ-बहिणीवर चाकू हल्ला

पैसा गुंतवून परतावाच नाही..

प्रसाद सोनार व त्याचा साथीदार विपुल लखीचंद चौधरी (रा. धानोरा, ता. चोपडा) यांना जैस्वाल यांनी वेळीवेळी एकूण ३८ लाख ८७ हजार ५०० रुपये दिले. ठरल्या प्रमाणे पैसा गुंतवणूक करूनही कोणताही परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

हेही वाचा: कपाशी घेऊन व्यापारी फरार; 46 शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

गुन्हा दाखल...

विलास जैसवाल यांच्या फिर्यादीवरून स्टेट बँकेचा कथित कर्मचारी प्रसाद सोनार आणि त्याचा साथीदार विपुल लखीचंद चौधरी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकारीच्या नादात हा गुन्हा घडल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त होत असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Web Title: State Bank Employee Defrauded The Trader Of Rs 39 Lakh In Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonSBIFraud Crime