Anganwadi Sevika Strike Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी मोर्चा

राज्यातील अंगणवाडी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा मंगळवारी (ता. २) सकाळी अकराला मुंबई येथील आझाद मैदान अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
Statewide march of Anganwadi workers today jalgaon news
Statewide march of Anganwadi workers today jalgaon newsesakal

Anganwadi Sevika Strike Jalgaon : राज्यातील अंगणवाडी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा मंगळवारी (ता. २) सकाळी अकराला मुंबई येथील आझाद मैदान अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. (Statewide march of Anganwadi workers today jalgaon news)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम आठ तास ग्राह्य धरून त्यांना वेतन श्रेणी लागू करावी, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेंशन द्यावे, सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटीचे नियम तयार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. २) मंत्रालयावर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अरुण गाढे (नागपूर), माया परमेश्वर (मुंबई), संजय मापले (अमरावती) यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

Statewide march of Anganwadi workers today jalgaon news
Anganwadi Sevika Strike : जिल्ह्यातील बालकांच्या आहारासह आरोग्य तपासणीवर परिणाम

तरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केले आहे.

Statewide march of Anganwadi workers today jalgaon news
Anganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविका, मदतनीस आक्रमक; संप चिघळण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com