Anganwadi Sevika Strike : जिल्ह्यातील बालकांच्या आहारासह आरोग्य तपासणीवर परिणाम

Implications for health screening including child nutrition in district due to strike dhule
Implications for health screening including child nutrition in district due to strike dhule esakal

Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत.

त्यामुळे बालकांना देण्यात येणारा नियमित आहार व आरोग्य तपासणीवर परिणाम झाला आहे.(Implications for health screening including child nutrition in district due to strike dhule news)

संपात जिल्ह्यातील सुमारे तीन हजार २४७ कर्मचारी सहभागी आहेत. जिल्ह्यातील दहा प्रकल्पांतर्गत एक हजार ८१७ अंगणवाड्या आहेत. त्यात २०७ मिनी अंगणवाडी आहेत. एक हजार ६५७ पैकी एक हजार ५३४ अंगणवाडी सेविका, एक हजार ७१३ पैकी एक हजार ५२६ मदतनीस, तसेच २०६ पैकी १८७ मिनी अंगणवाडी सेविका संपात सहभागी आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी तसेच निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी काही कर्मचारी चार डिसेंबरपासून, तर काही सात डिसेंबरपासून संपात सहभागी झाले आहेत.

अशा आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १८ ते २५ हजार रुपये दरमहा वाढ करावी. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी नवीन अद्ययावत मोबाइल शासनाने पुरवावे, मिनी अंगणवाडी केंद्राचे केंद्र सरकारच्या आदेशांनुसार नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे, सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनेबाबत प्रस्ताव मंजूर करावा, रिक्त जागेवर दहावी उत्तीर्ण मदतनीस यांना अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती द्यावी.

पदे भरताना शिक्षण व वयाची अट करण्यात यावी, नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुधारित घरभाडे लागू करून थकबाकी द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभाचा फायदा द्यावा, महापालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करावे, आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प असून तो दर सर्वसाधारण बालकासाठी १६ रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा आदी मागण्यासांठी बेमुदत संप सुरू आहे.

Implications for health screening including child nutrition in district due to strike dhule
Anganwadi Workers Strike : अंगणवाडी सेविकांचा 'या' प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन!

मार्गदर्शक सूचना

अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना वर्षातून ३०० दिवस आहार पुरविणे बंधनकारक आहे.

संपकाळातही पोषण आहारापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे यांनी पत्रक काढून अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना लाभार्थ्यांचे पालक, महिला मंडळ, बचत गट तसेच सामाजिक संस्थांमार्फत पोषण आहाराचे वाटप करावे, अशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, अध्यक्षा माया परमेश्वर, रामकृष्ण पाटील, अमोल बैसाणे, राजू पाटील, लता गावित, नयना मराठे, राखी पाडवी, मनीषा मोरे, जयवंता पाटील, प्रियांका पाटील, रंजना बागले, रत्ना पगारे, पुष्पा दीक्षित, रेणुका कासार, कल्पना जकातदार, सुरेखा बोरसे आदींसह हजारो कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत.

पोषण आहाराचे नियमित वितरण

अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून संप पुकारला आहे. संपामुळे अंगणवाडी बंद असली तरी सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहू नये यासाठी सोनगीर (ता. धुळे) येथील ऋषीप्रसाद स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून बालकांना अंगणवाडीच्या प्रांगणात बोलावून पोषण आहार दिला जात आहे.

गावात १८ अंगणवाडींमध्ये १८ सेविका आणि १८ मदतनीस आहेत. हे कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या काळातही मुलांना पोषण आहार नियमित मिळेल, अशी व्यवस्था ऋषीप्रसाद स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने केली आहे. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.

Implications for health screening including child nutrition in district due to strike dhule
Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com