Jalgaon News: अमळनेर रस्त्यावरील पथदीप ठरताहेत शो-पीस; ‘महावितरण’ परिसरातून वाहनधारकांचे अंधारात मार्गक्रमण

Closed street lamp on Amalner road.
Closed street lamp on Amalner road. esakal

Jalgaon News : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या ‘बायपास’लगत पारोळा- अमळनेर रस्त्यावर अंडरपास आहे. या अंडरपासवरील पथदीप गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद आहेत. तसेच पारोळा ते अमळनेर या मार्गावरून दररोज शेकडो वाहने दिवसरात्र ये-जा करतात.

मात्र रात्री सातनंतर वाहनधारकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. परिणामी, अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत. (streetlights on underpass have been off for last three months due to technical problems jalgaon news)

वास्तविक काही अंतरावरच महावितरण कंपनीचे कार्यालय आहे तसेच उजव्या बाजूला वसाहती आहेत. असे असताना देखील ‘अंडरपास’ पुढील रस्त्यावर असलेले पथदीप केवळ शो-पीस ठरत असल्याची खंत रहिवाशांसह सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

पालिकेकडून नागरिकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यात मुख्यत्वे पाणी, आरोग्य, वीज यांना प्राधान्य दिले जाते. मात्र या तिन्ही गोष्टी पालिकेकडून कासवगतीने पुरविल्या जात असल्यामुळे शहरवासीयांनी पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या स्थितीत पारोळा-अमळनेर रस्त्यावर अंबिका डेरीपर्यंत पथदीप आहेत.

मात्र अंडरपास ओलांडल्यानंतर महावितरण कार्यालयापर्यंत एकही पथदीप सुरू नसल्यामुळे पादचाऱ्यासह वाहनधारकांना अंधारातून वाट काढत जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे. परिणामी, परिस्थिती अशीच राहिली तर हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान, याबाबत महावितरण कंपनी व पालिकेने समन्वय साधत पथदिव्यांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Closed street lamp on Amalner road.
Jalgaon News: भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान; रेल्वे व्यवस्थापकांनी स्वीकारला सन्मान

"पारोळा-अमळनेर मार्गावरील पथदीप बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आठवड्याभरात तेथील पथदीपांची तपासणी करून तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील." - सुमित पाटील, प्रभारी विद्युत अभियंता, नगरपालिका, पारोळा

"महामार्गाचे काम सुरू असताना येथील वीजपुरवठा बंद झाला आहे. याबाबत पालिकेशी समन्वय साधत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल." - गौतम मोरे, शहर अभियंता महावितरण

पालिका, महावितरणला दिवे देणार

गेल्या अनेक दिवसांपासून पारोळा-अमळनेर रस्त्यावरील पथदीप बंद असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध सघटनांसह नागरिकांनी अनेकदा पालिका व महावितरण कंपनीशी चर्चा करून देखील पथदीप सुरू होत नाही. त्यामुळे अडचणींमध्ये वाढ होत असून, या मार्गावरील पथदीप तत्काळ सुरू न केल्यास पालिका व महावितरणला दिवे देऊन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Closed street lamp on Amalner road.
Jalgaon News : भटक्या श्‍वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com