Jalgaon News : निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक : पंडित मेवालालजी महाराज

sleep
sleep esakal

एरंडोल (जि. जळगाव) : निरोगी आरोग्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवून पुरेशा प्रमाणावर झोप घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सेंधवा येथील गायत्री धामचे प्रमुख पंडित मेवालालजी महाराज यांनी केले. (Sufficient sleep is essential for healthy health Pandit Mewalalji Maharaj Jalgaon News)

आर्यन फाउंडेशन, दीपस्तंभ फाउंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र आणि राठी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात ‘चलो प्रकृती के साथ अपना आरोग्य अपने हात’ या विषयावर ते बोलत होते. बालाजी ग्रुपचे संचालक दिनेश काबरा, युवा उद्योजक संजय काबरा, डॉ. रवी महाजन, डॉ. रेखा महाजन, देविदास बिर्ला, प्राचार्य एन. ए. पाटील, उपमुख्याध्यापिका शोभा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सैन्य दलातील निवृत्त जवान अनिल पाटील यांच्या आयोजकांतर्फे मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.

पंडित मेवालालजी महाराज यांनी निरोगी आरोग्य राहण्याबाबत सविस्तर माहिती दिली. आहारावर नियंत्रण, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार, व्यसनांपासून दूर राहणे याचे पालन केल्यास कोणत्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. प्रत्येक माणसाचे केवळ अहंकारामुळे नुकसान होत असल्यामुळे गर्व आणि अहंकारापासून सर्वांनी दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक आजार मानसिक भीतीमुळे वाढत असतो, त्यासाठी आजाराची भीती मनापासून दूर करावी.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

sleep
Nashik News : अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 साई भक्तांवर काळाचा घाला

कुटुंब, परिवार, मित्र यांच्याशी संवाद नसल्यास मानसिक आजार होत असतात. त्यामुळे सर्वांनी परिवारातील सदस्यांशी संवाद साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आजारी पडल्यास औषधे केवळ त्रासापासून दूर ठेवत असतात. सर्वांनी महिन्यातून दोन- तीन दिवस आरोग्य दिवस म्हणून पाळल्यास कोणताही आजार होणार नाही असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी स्वयंपाक करताना महिलांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता, त्याचा योग्य आणि कमी वेळ वापर करावा. मोबाईलचा त्यामुळे लहानपणापासून डोळ्यांची समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले.

मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील यांनी परिचय करून दिला. दर्शन दुबे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. स्नेहल राठी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. जी.आर. महाजन, नरेश डागा, गोपाल महाजन, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह महिला, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

sleep
Jalgaon Crime News : नोटीसच्या पोचपावतीवर बनावट सह्या; खळबळजनक प्रकार उघडकीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com