अंघोळीला गेलेली आई अजून का येत नाही? म्हणून चिमुकलीने स्नानगृहात डोकावले आणि आ ऽ ई..च्या किंकाळीने सारेच सुन्न झाले      

susaeed
susaeed

पहूर: पहूर पेठ (ता. जामनेर) येथील संतोषी मातानगरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने दुर्धर आजारामूळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्कार्फने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

आवर्जून वाचा- जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१ फ्रंटलाईन कोरोना योध्दांनी घेतली लस 

संतोषीमाता नगर येथील रहिवासी योगेश गायकवाड हे पत्नी अर्चना गायकवाड (वय ३०) हे आपल्या दोन मुलांसह राहतात. योगेश गायकवाड हे महावितरण कंपनी मध्ये नोकरीला असून ते रात्रपाळीसाठी कर्तव्यावर गेले होते. घरी अर्चना दोघ मुलांसह एकटी घरी होती. अर्चना गायकवाड गेल्या 6 ते 7 वर्षांपासून संधीवाताचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्रास असह्य झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलून थेट जीवनयात्राच संपविली.

चिमुकलीची आ ऽ ई...अशी किंकाळी

अंघोळीसाठी स्नानगृहात गेलेली आपली आई अजून कशी बाहेर येत नाही ?, म्हणून 10 वर्षांची तनू आपल्या आईला आवाज देते, मात्र स्नानगृहातातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने आत डोकावून पाहिले असता, चिमुकल्या तनूने एकच किंकाळी ठोकली आ ऽ ई . चिमुकल्या तनूच्या आईने आजारपणाला कंटाळून स्नानगृहातच स्कार्फने गळ्याला फाशी लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.

चिमुक्यांचे बालपणीच मातृछत्र हरपले

त्यांच्या मृत्यूने मात्र निर्वेद (14 वर्षे )आणि तन्वी ( 10 वर्षे ) या चिमुकल्यांचे बालपणीच मातृछत्र हरपले. पहूर ग्रामीण रुग्णालयात 'पीएम 'साठी डॉक्टर नसल्याने मयत अर्चना गायकवाड यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

उपचारासाठी जाणार होते

त्यावेळी अर्चनाचा मुलगा निर्वेद क्लासला गेलेला होता. तर तन्वी घरीच होती. भाऊ नवल पाटील घरात आल्यावर त्यांनी तन्वीला आईबाबत विचार पुस केली.आई आंघोळ करीत असल्याचे सांगितले. नवल पाटील हे बहिणीची वाट पाहत घरात बसून राहिले, बराच वेळ झाल्यावरही बहिण अर्चना ही बाहेर आली नाही म्हणू नवल पाटील यांनी भाची तनूला मम्मी ला बघून ये असे सांगितले. यावरून तनू ही स्नानगृहामध्ये आईला पाहण्यासाठी गेली असता, तनूला आईने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून धक्काच बसला . तीने आ ऽ ई अशी किंकाळी मारली.

चिमुकल्या निर्वेदने दिला अग्निडाग

नवल पाटील यांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली. घटनास्थळी पहूर पोलीसांनी पंचनामा करून पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पहूर येथे शोकाकुल वातावरणात अर्चनाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमुकल्या निर्वेदने आपल्या आईच्या चितेला दाटलेल्या कंठाने अग्नीडाग दिला, हे दृष्य पाहून उपस्थितांची डोळे पाणावली.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com