Jalgaon Crime News : शहरातून 3 दुचाकींची चोरी

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : शहरातील संभाजीनगरातील रहिवासी स्वप्नील शालिग्राम पाटील (वय ३४) १० एप्रिलला दुपारी एकला बेंडाळे चौकातील पेट्रोलपंपामागे दुचाकी (एमएच १९, बीएक्स ०१५८)वरून आले होते. (Theft of 3 bikes from city jalgaon crime news)

एका झाडाखाली दुचाकी उभी करून ते बाजारात कामासाठी गेले. थोड्या वेळात परतल्यावर त्यांची दुचाकी लांबविली होती. तब्बल नऊ दिवस दुचाकीचा शोध घेतला. मात्र, दुचाकी कुठेही आढळली नाही. याबाबत स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस नाईक किरण वानखेडे तपास करीत आहेत.

दुकानासमोरून दुचाकीची चोरी

शाहूनगर हनुमान मंदिराजवळील रहिवासी व झेरॉक्स व्यवसायिक दीपक मल्हारी टेकावडे (वय ४६) यांची दुचाकी (एमएच १९, डब्ल्यू ५९०) चोरट्यांनी लंपास केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक योगेश पाटील तपास करीत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

crime news
Jalgaon Bribe News : ‘महावितरण’च्या तंत्रज्ञासह पंटरला लाच घेताना पकडले

गोविंदा रिक्षा स्टॉपवरून दुचाकी लंपास

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी अमोल सुपडू सपकाळे (वय २४) मित्रासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शहरात आला होता. गोविंद रिक्षा स्टॉपजवळ दुचाकी (एमएच १९, डीबी ५५५२) उभी करून तो मिरवणुकीत सहभागी झाला. काही वेळातच त्याची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक किशोर निकुंभ तपास करीत आहे.

crime news
Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलगी अमळनेरमधून बेपत्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com