esakal | जळगावमध्ये 'क्लाउड कव्हर' नसल्याने पाऊस बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावमध्ये 'क्लाउड कव्हर' नसल्याने पाऊस बेपत्ता

पावसाचे ढग तयार होऊनही पाऊस बेपत्ता होणे होय. २४ जुलैपर्यंत पावसाचा खंड राहणार आहे. कधी पडेल तर कधी पडणार नाही. झाला तरी तुरळक होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

जळगावमध्ये 'क्लाउड कव्हर' नसल्याने पाऊस बेपत्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात पावसाचे काळेभोर ढग आकाशात जमा होतात. आता जोरदार पाऊस येईल, असे सर्वांनाच वाटत असताना काही वेळातच काळेभोर आकाश पांढरेशुभ्र होते अन्‌ चक्क सूर्यप्रकाश पडतो. पावसाचे दिवस, वातावरण पोषक असूनही पाऊस पडत नाही. दोन दिवसांपासून पाऊस चकवा देतोय. याला कारण म्हणजे 'क्लाउड कव्हर' नसणे. पावसाचे ढग तयार होऊनही पाऊस बेपत्ता होणे होय. २४ जुलैपर्यंत पावसाचा खंड राहणार आहे. कधी पडेल तर कधी पडणार नाही. झाला तरी तुरळक होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ३०६ गावांतील शाळांमध्‍ये वाजली घंटा

गेल्या गुरुवारी चांगला पाऊस बरसला. मात्र दोन दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. यामुळे असह्य उकाडा वाढून केव्हा एकदाची उकाड्यापासून सुटका होतेय असे चित्र आहे. सकाळी, दुपारी, रात्री पावसाचे ढग तयार होतात. मात्र पाऊस पडत नाही. शास्त्रीय कारणानुसार आगामी आठ दिवसांत जिल्ह्यात पाऊस पडेल अशा ढगांची निर्मिती होणार नाही. पावसाचे ढग आले तरी काही ठिकाणीच काही वेळ नंतर चक्क सूर्यप्रकाश पडेल. कोठे पाऊस पडेल तर कोठे पडणार नाही.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहाच्या आत

सध्या असे आहे वातावरण

जिल्ह्यात पावसाचे ढग तयार होताहेत. मात्र पावसाच्या ढगांची व्याप्ती (क्लाउड कव्हर) तयार होत नाही. म्हणजेच ५० टक्के पावसाचे ढग तयार होतात. मात्र उष्णता असल्याने वातावरणात गार वारे सुटत नाही. गार वारे सुटले नाही की ढगांपासून पाऊस पडत नाही. पाऊस पडण्यासाठी पावसाच्या ढगांना गार वाऱ्याची गरज असते. तसे वारे वाहत नाहीत. म्हणजेच पाऊस पडण्यायोग्य पोषक वातावरण तयार होत नाही. पाऊस पडण्यासाठी ढगांची गर्दी होणे, गार वारा वाहणे, हवेतील उष्णता बंद होणे या बाबींची गरज असते.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अडीचशेच्या टप्प्यात

जिल्ह्यात या आठवड्यात खंडित स्वरूपाचा पाऊस पडेल. सलग चार-पाच तास किंवा पावसाची झडी लागणार नाही. तशी ढगांची व्याप्ती आकाशात होणार नसल्याचे चित्र आहे. २४ नंतर मात्र चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

- नीलेश गोरे, हवामानतज्ज्ञ

loading image