शिवसैनिकांनी रोखला अंदाज समिती सदस्यांचा रस्ता

sakal logo
sakal logo
Summary

आमदार समर्थकांनी या समिती सदस्यांचा रस्ता अडवून घोषणा दिल्या.

जळगाव: मुक्ताईनगर येथे बोदवड उपसा सिंचन योजना कामाच्या पाहणीप्रसंगी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे वृत्त आहे. याच वादातून आमदार समर्थकांनी या समिती सदस्यांचा रस्ता अडवून घोषणा दिल्या. आमदार, पोलिस निरीक्षक व नायब तहसीलदारांच्या मध्यस्थीने हा वाद शमल्याचेही बोलले जात आहे.

राज्याची विधिमंडळ अंदाज समिती दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती. या समितीने गुरुवारी (ता.२६) मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील पूर्णा नदीच्या काठावर सुरू असलेल्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या जॅकवेल कामाची पाहणी केली.

sakal logo
जळगाव: आतापर्यंत 12 लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

असा झाला वाद

या पाहणीदरम्यान समितीचे अध्यक्ष आमदार रणजित कांबळे व त्यांच्यासमवेत इतर आमदार हे समितीचे सदस्य म्हणून उपस्थित होते. बोदवड उपसा सिंचन योजनेची पाहणी करत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी आले. आमदार कांबळे यांनी वारंवार विदर्भाच्या योजनेचा निधी या कामासाठी पळवण्याचा उल्लेख या वेळी केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असे न करता हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे असा मुद्दा मांडला.

sakal logo
जळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत पुन्हा वाढ; चार नवे रुग्ण आढळले

दोघांत शाब्दिक चकमक

या योजनेला राज्याच्या कॅबिनेटची मंजुरी नसल्याचा उल्लेख आमदार कांबळे यांनी केला. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून कॅबिनेटची मंजुरी असल्याचे पत्रच समोर दाखवले. यावरून दोन्ही आमदारांत शाब्दिक चकमक उडाली. या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाही या प्रसंगी दिल्या.

sakal logo
जळगाव जिल्ह्यातील धरणात वीस टक्के कमी साठा

रस्ताही अडवला

पाहणीनंतर समितीचा ताफा मार्गस्थ होत असताना शिवसैनिकांनी तो ताफा अडवला. त्यामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांची यासंदर्भात भेट घेतली असता या पाहणीदरम्यान कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याने त्यांचा संताप झाला. आपण कार्यकर्त्यांची समजूत काढली, त्यातून वाद शमल्याचे पाटील म्हणाले. या वेळी पोलिस निरीक्षक राहुल खताळ, नायब तहसीलदार प्रदीप झांबरेही यांनीही मध्यस्थी केली.

sakal logo
जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ४९ हजार जणांनी घेतली लस

अंदाज समिती सदस्य पाहणी करत असताना स्थानिक आमदार व त्यांच्या समर्थकांचा काहीतरी गैरसमज झाला. आम्ही त्यांना समितीचे कामकाज समजावून सांगितले. नंतर आमची बैठकही झाली. रस्ता रोखल्याचा प्रकार झाला नाही.

- आमदार रणजित कांबळे (विधिमंडळ, अंदाज समिती अध्यक्ष)

अंदाज समितीच्या पाहणीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांचा गैरसमज झाल्याने त्यांनी पाहणीस विरोध केला. मात्र, आमदारांनी त्यांची समजूत घातली, नंतर बैठक होऊन कामकाज सुरळीत झाले.

- राहुल खताळ (पोलिस निरीक्षक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com