Jalgaon Crime News : पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

Jalgaon Crime News : पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास
esakal
Updated on

Jalgaon Crime News : पॉलिश करण्याचा बहाणा करून दोन भामट्यांनी ईश्वर कॉलनीतील ६५ वर्षीय वृद्धेचे एक लाख २५ हजारांचे दागिने लंपास केले.

मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (वय ६५) व बायादेवी उदयराज वर्मा यांच्या घरी मंगळवारी (ता. ४) सकाळी नऊच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती आले. (thief stolen gold jewellery of old women jalgaon crime news)

आमच्याकडील पावडरने पितळी व तांब्याचे भांडे साफ करून देतो, असे त्यांनी सांगितले. वृद्धेने घरातील तांब्या दिला. तो त्यांनी साफ करून दिला. नंतर वृद्धेने दोन चांदीचे कमरपट्टी दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले.

त्यामुळे वृद्धेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रिंगा दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime News : पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास
Dhule Crime News : पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला केले ठार मग पतीची आत्महत्या... कुंडाणेमध्ये संशयास्पद घटना

दोघांनी एका पातेल्यात हळद व लाल रंगाची पावडर टाकून दागिने गॅसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर थंड झाल्यावर काढून घ्या, असे सांगितले. सोन्याचे दागिने हातचालाखीने चोरून चोरट्यांनी धूम ठोकली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

Jalgaon Crime News : पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास
Jalgaon Crime News : 50 लाखांसाठी विवाहितेचा छळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com