Jalgaon Crime News : बंद घर फोडून लॅपटॉप लांबविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Jalgaon Crime News : बंद घर फोडून लॅपटॉप लांबविला

जळगाव : शहरातील कोल्हेनगर परिसरातील बंद घर (Locked House) फोडून २५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेला. (Thieves stole laptop worth 25 thousand by breaking locked house jalgaon crime news)

सावखेडा येथील मुळ रहिवासी समीर संजय तडवी (वय २४) सध्या कोल्हेनगर परिसरात वास्तव्याला आहेत. शनिवारी (ता. ४) दुपारी दोन ते सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचे घर बंद असताना, चोरट्याने घराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील सामान अस्तव्यस्त केले. घरातील २५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. समीर तडवी घरी आल्यावर चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेल्याचे त्याच्या लक्षात आले.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

याबाबत समीरने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुशील चौधरी तपास करीत आहे.

टॅग्स :JalgaonrobberyLaptopthief