टॉयलेट घोटाळ्यातील संशयित अद्याप मोकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Toilet Scam

टॉयलेट घोटाळ्यातील संशयित अद्याप मोकाट

रावेर (जि. जळगाव) : येथील पंचायत समितीतील टॉयलेट घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून २०१५ पासूनची त्या संशयित १२६ जणांच्या बँक खात्यांची माहिती पोलिस विभागाने मागविली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला. मात्र, अद्यापही कारवाई होत नसल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.

येथील पंचायत समितीच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत अनुदान वाटपात दीड कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याबाबत दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही संशयित अजूनही फरार असून, पोलिसांकडून सव्वा महिना उलटला तरीही कागदपत्रांची कसून माहिती घेतली जात आहे. पोलिसांना पंचायत समितीकडून चौकशीसाठी लाभार्थींचे प्रस्ताव अजूनही मिळालेले नाहीत तसेच स्टेट बॅंकेच्या येथील शाखेकडून देखील आवश्यक ती माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अनुदानाचे पैसे एकापेक्षा जास्त वेळा आलेल्या त्या संशयित १२६ खात्यांवर पोलिसांची नजर आहे. याबाबतची माहिती तालुक्यातील विविध बॅंकांकडून मागविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोघा संशयितांवर पोलिसांची नजर असून, त्यांना अटक झाल्यावरच पुढील तपासाला आणि कारवाईला गती मिळेल, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा: ग्रामसेवकासह सरपंचपतीस 6 हजारांची लाच भोवली

दरम्यान, हे प्रकरण अर्थ व्यवहाराशी निगडित असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपास लेखापरीक्षकामार्फत करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या तिघा कर्मचाऱ्यांच्या समितीने जो अहवाल दिला त्याला पुष्टी मिळणार आहे. गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटल्याने आता तालुक्यातून व जिल्ह्यातून देखील कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील कारवाई होईल की हे प्रकरण दडपले जाईल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

हेही वाचा: जळगाव पोलिसाची मुंबई पोलिसाला मारहाण; 1 गंभीर

Web Title: Toilet Scam Suspect Still Not Found Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonscamtoilets
go to top