
Jalgaon News : पोलिस अधीक्षकांनी फिरविली भाकरी; 17 निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव : पोलिस (Police) अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल १७ प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह १५ सहाय्यक निरीक्षकांसोबत १५ उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
यातील निम्मे पोलिस ठाण्यांवर नवीन पोलिस निरीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. (Transfer of 17 inspector in district reshuffle by combining old and new jalgaon news)
जिल्ह्याची वाढती गुन्हेगारी व प्रशासनातील मरगळ झटकून नव्या जोशाने कामाला सुरवात व्हावी, कायदा व सुव्यवस्था राहावी, आगामी काळातील निवडणुका, सण- उत्सव या पाश्र्वभूमीवर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ पोलिस निरीक्षक आणि नव्याने बाहेरील जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या निरीक्षकांची योग्य सांगड घालत बदली आदेश पारीत केले आहेत.
पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील (नियंत्रण कक्षातून-रामानंदनगर), संदीप पाटील (नियंत्रण कक्षातून-चाळीसगाव शहर), कावेरी कमलाकर (नियंत्रण कक्षातून-चोपडा ग्रामीण), राकेश मानगावकर (यावल-यावल), रंगनाथ धारबळे (नियंत्रण कक्ष-जि.वि.शा.), बबन आव्हाड (नियंत्रण कक्षातून- चाळीसगाव ग्रामीण),
उद्धव डमाळे (नियंत्रण कक्षातून- धरणगाव), राजेंद्र पाटील (नियंत्रण कक्षातून- भडगाव), विजय शिंदे (रामानंदनगर-अमळनेर), सतीश गोराडे (नियंत्रण कक्षातून-एरंडोल), जयपाल हिरे (अमळनेर-एमआयडीसी), ज्ञानेश्व जाधव( एरंडोल येथून-जिल्हापेठ पोलिस ठाणे), अशोक रावजी उतेकर (भडगावहून सायबर पोलिस ठाणे), संजय ठेंगे (चाळीसगाव ग्रामीण-नियंत्रण कक्षात),
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
शंकर शेळके (मुक्ताईनगरातून जळगाव शनिपेठ), राहुल खताळ (धरणगावातून पाचोरा पोलिस ठाणे), कांतीलाल पाटील (चाळीसगाव शहर-चोपडा शहर), अशा एकूण १७ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे सूचित केले आहे.
दोन महिला निरीक्षक
नव्याने बदली आदेश झालेल्या निरीक्षकांमध्ये दोन महिला पोलिस निरीक्षकांचा समावेश असून, रामानंदनगर पोलिस ठाण्याचा पदभार शिल्पा पाटील, तर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याची धुरा निरीक्षक कावेरी महादेव पाटील यांना सोपविली आहे.
१५ सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
मानव संसाधन-सुनंदा पाटील, एसडीपीओ चाळीसगाव वाचक-आशा जाधव, भुसावळ तालुका-अमोल पवार, एमआयडीसी-अमोल मोरे, जळगाव शहर-किशोर पवार, भुसावळ शहर-नीलेश गायकवाड, यावल-विनोदकुमार गोसावी,
रावेर-शितलकुमार नाईक, सावदा-जालिंदर पळे, अडावद-गणेश बुवा, एमआयडीसी-रामेश्वर मोताळे (प्रशासकीय व मुदतवाढ) जिल्हापेठ-किरण दांडगे, शहर वाहतूक शाखा-संदीप हजारे, धरणगाव-प्रमोद कठोरे, तर मुक्ताईनगर-संदीप दुनगहू यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.
१५ उपनिरीक्षकांच्या बदल्या
अमळनेर पोलिस ठाणे- भय्यासाहेब देशमुख, डायल ११२-गणेश अहिरे, सावदा-विनोद खांडबहाले, पाचोरा-विजया बसावे, यावल-अविनाश दहिफळे, मुक्ताईनगर-संदीप चेडे, नियंत्रण कक्ष-गोकुळ गवारे यांना प्रशासकीय व नियमित पदस्थापना देण्यात आली आहे,
तर स्थानिक गुन्हे शाखा-गणेश चौभे, सावदा-शांताराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा-गणेश वाघमारे, वाचकशाखा उपविभाग-सुनील वाणी, शनिपेठ पोलिस ठाणे-प्रदीप चांदलकर, जिल्हा जिविशा-के. परवीन तडवी, आर्थिक गुन्हे शाखा-सुदाम काकडे, शनिपेठ पोलिस ठाणे-अमोल देवडे यांची विनंतीवरून बदली झाली आहे.