संघर्षमय प्रवास करत सांगवीचा आदिवासी तरुण बनला डॉक्टर

आदिवासी तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
success story
success storyesakal

पहूर (ता. जामनेर) : 'असाध्य ते साध्य...करिता सायास, कारण अभ्यास..तुका म्हणे' या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सातत्याने अभ्यास करून आर्थिक परिस्थितीवर मात करत सांगवी (ता . जामनेर) येथील विजय शेरखॉ तडवी या आदिवासी तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

सांगवी येथील शेरखॉ रमजान तडवी आणि बेबाबाई तडवी यांनी अतिशय कष्टातून हातमजुरी करून मुलगा विजयच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. जामनेर येथील ललवाणी विद्यालयातून विजयने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच चाणाक्ष असलेल्या विजयने केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळविले. माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय साकेगाव येथे पूर्ण करून दहावीत ९५ टक्के तर बारावी बोर्ड परीक्षेत ९० टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादित केले. त्यानंतर विजयने नीट (NEET) परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळविला. नुकतेच त्याने या परीक्षेत प्रथम श्रेणीत उज्ज्वल यश संपादित करून आई -वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.

success story
जळगाव : पारोळ्यात किराणा दुकान फोडून 20 हजार रुपये लंपास

बेताची आर्थिक परिस्थिती विजयसाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरली. रात्रंदिवस अभ्यास करून विजयने आपले ध्येय साध्य केले. आई-वडिलांच्या कष्टाचे त्याने केलेले चीज तरुणांसाठी प्रेरणादायी असून, त्याने तडवी आदिवासी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विजयच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

''गोरगरीब रुग्णांची सेवा करून समाज ऋणातून उतराई होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो.'' - डॉ. विजय तडवी, सांगवी, ता. जामनेर

success story
जळगाव जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर बेरोजगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com