Jalgaon Crime News : 33 लाखाचा संतूर साबण घेऊन ट्रक मालक व चालक फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : 33 लाखाचा संतूर साबण घेऊन ट्रक मालक व चालक फरार

अमळनेर : शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचा संतूर साबण सांगितलेल्या ठिकाणी न पोचल्याने अमळनेर पोलिसात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विप्रो कंपनीचा साबणाचा माल तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून ट्रक (आरजे ११, जीए ८१३८) चा चालक कैलाश श्रीराम गुजर (रा. भानूनगर, ता. जहाजपूर, जि. भिलवाडा, राजस्थान) व मालक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर (रा. मुरलीविहार, देवरौठा शाहगंज,आग्रा, उत्तरप्रदेश) यांच्या मालकीचा ट्रक भाड्याने घेतला होता. (Truck owner and driver absconding santoor soap worth 33 lakhs Jalgaon Crime News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष

चार जानेवारीला या वाहनात विप्रो कंपनीतून दहा टन १०० किलो वजनाचा संतूर साबण तुमकूर (कर्नाटक) येथे पोचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टमार्फत ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून गाडी भरण्यात आली होती. चालक व मालक यास ५० हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली होती.

नऊ जानेवारीला ट्रक तुमकूर येथे पोचणे आवश्यक होते. मात्र माल त्या ठिकाणी पोचला नाही. चालक आणि मालक दोघांचे फोन बंद येत आहेत .त्यामुळे त्यांनी विश्वासघात करून ट्रकमधील ९८० बॉक्स सुमारे १८ टन १०० किलो वजनाचे सुमारे ३३ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा माल अपहार केल्याचे दिसून येत आहे.

लोडिंग मॅनेजर अनिलकुमार माईसुख पुनिया यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime News : गणेश कॉलनीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय