Latest Marathi News | ‘तो’ अनोळखी मृतदेह जळगावच्या तरुणाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death news

‘तो’ अनोळखी मृतदेह जळगावच्या तरुणाचा

एरंडोल (जि. जळगाव) : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटचारीच्या खालच्या भागात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पोलिसांनी काही तासातच पटवून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. (Latest Marathi News)

हेही वाचा: तब्बल 5 शस्त्रक्रियांनंतरही त्रास कमी होईना; अखेर डॉ. शिंदेंच्या प्रयत्नांना यश

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल राजलक्ष्मीजवळील पाटचारीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मंगळवारी (ता. २६) सकाळी नऊला पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अनिल पाटील, काशिनाथ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साहाय्याने पाटचारीच्या खोल भागातून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणला. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून केवळ पाच तासांत मृताची ओळख पटवली. हा तरुण जळगाव येथील सम्राटनगरमधील कैलास ओंकार माळी (वय ३५) असून दुपारी तीनला मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: गटारी अमावस्या : तळीरामांवर एक्साईज, पोलिसांची करडी नजर

Web Title: Unidentified Dead Body Of Jalgaon Young Man

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaondead body found
go to top