Unseasonal Rain : अजिंठा लेणी परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस; नदीला आला पूर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Waterfalls overflowing due to heavy rains in the hills.

Unseasonal Rain : अजिंठा लेणी परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस; नदीला आला पूर!

तोंडापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह (Ajanta Caves) तोंडापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गारपिटीसह जोरदार पाऊस (Unseasonal Rain) झाला.

त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लेणीतील घबधबा ओसंडून वाहत असून नदीला पूर आला आहे. हा पूर पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली असून, वीकेंडला पावसाचा आनंद लुटला. (unseasonal rain Tondapur Ajanta Caves area received heavy rain with hail for last 2 days jalgaon news)

अजिंठा लेणीसह तोंडापूर परिसरात शुक्रवारी (ता. १७) व शनिवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. तसेच डोंगररांगांमध्ये गारपीटही झाली. या पावसामुळे नदी-नाले भरून वाहू लागले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील माल व वीटभट्टीधारकाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

अजिंठा लेणीसह तोंडापूर व लगतच्या गावांमध्ये शनिवारी (ता. १८) दुपारी तीनपासून गारपिटीसह सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अजिंठा लेणीतील धबधबा ओसंडून वाहू लागला असून, अचानक नदीला आलेल्या पुराचा आनंद लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी घेतला तर तोंडापूर परिसरात मात्र या अवकाळी पावसामुळे गहू, मका, कांदा, सूर्यफूल या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.