Fake Document Case : पोलिस पाटील भरतीत बनावट कागदपत्रांचा वापर; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

Fake Documents News
Fake Documents Newsesakal

Jalgaon News : पोलिस पाटील भरतीसाठी अनेकांनी बेकायदेशीर इडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) काढल्याचे उघडकीस आले असून, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (Use of fake documents in Police Patil recruitment jalgaon news)

पोलिस पाटील भरतीत आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे काही गावांना इडब्ल्यूएस घटकांना संधी मिळणार आहे.

चोपडा तालुक्यातील लासूर येथे योगेश माळी, सुरेश माळी, वासुदेव महाजन (माळी), प्रेमराज शेलकर (माळी/महाजन) यांनी आर्थिक दुर्बल घटक म्हणजे इडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fake Documents News
Jalgaon Crime : सिव्हीलपासून जेलपर्यंत चपलेतून गांजा तस्करी! जेलच्या गेटवर तपासणीत आढळला गांजा

शासन नियमानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती आदी घटकांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देता येत नाही.

त्यामुळे खुल्या गटातील उमेदवार वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लासूर येथील जितेंद्र गांगुर्डे यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे.

Fake Documents News
Jalgaon News : लाखो लिटर दारू रसायन संयुक्त कारवाईत नष्ट; जिल्‍हाधिकाऱ्यांचे विशेष आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com