Jalgaon : गिरणा पट्ट्यातील केळीला उत्तर भारतात भाव

Farm workers loading bunches of bananas after processing into trucks.
Farm workers loading bunches of bananas after processing into trucks.esakal

मेहुणबारे (जि. जळगाव) : आजच्या युगात आधुनिक पद्धतीचा वापर करीत शेतकरी कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी सतत धडपड करीत असतो. अशाच धडपडीतून वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्याची केळी थेट उत्तर भारतात हरयाणात पोहोचली आहे. (varkhed jalgaon Banana transport to haryana North India Jalgaon latest marathi news)

दोन हजार २५० रुपये दर क्विटलप्रमाणे ही केळी व्यापाऱ्यांकडून खरेदी केली गेली. केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढला आहे. कंदपासून (खोड) रोपे तयार करून केळीचे उत्पादन घेतले आणि त्यात त्यांना भरघोस फायदा झाला.

वरखेेडे येथील शेतकरी योगेश बाबुलाल पवार यांनी आपल्या शेतात सुमारे ५ हजार केळी झाडांची लागवड केली आहे. त्यापैकी त्यांनी नुकतीच ७१० केळी झाडांची कापणी करण्यात आली. त्यात त्यांना २२५० रूपये प्रति १८० क्विटल म्हणजे १८ टन माल झाला. ही केळी दर्जेदार असल्याने ती थेट उत्तर भारतात हरयाणा राज्यात पोहोचली आहे.

Farm workers loading bunches of bananas after processing into trucks.
शिक्षणासाठी दरेवाडीचे चिमुरडे निघाले उपाशीपोटी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात

कंदापासून रोपे निर्मिती

केळीचे पीक तसे अतिसंवेदनशील असते. प्रतिकूल वातावरणाचा या पिकाला फटका बसतो. कधी भाव मिळत नाही. विशेष म्हणजे, शेतकरी योगेश पवार यांनी शेतात तिरीचा बाग घेतला होता.

या बागेचा कंद म्हणजे खोडापासून घरच्या घरी रोप तयार करून त्याची लागवड केली. यासाठी त्यांना नाशिक येथील अग्रो कंपनीचे सदाशिव खैरनार यांचे सहकार्य लाभले. एकीकडे शेतकरी केळीचे महागडे रोपे घेतात, पण ती लागवड यशस्वी होईल याची शास्वती नसते.

मात्र पवार यांनी चक्क कंदपासूनच रोेपे तयार करून केळीचा नवीन प्रयोग साकारला. पूर्वी केळी उत्पादक शेतकरी शेतात कंद लावत. त्यातून रोपे तयार केली जात. मात्र कंद लागवड मागे पडली.

तयार आयते रोपे लागवडीवर शेतकऱ्यांचा भर राहीला. योगेश पवार यांनी आगळावेगळा प्रयोग करून कंदपासून केळीचे रोेपे तयार केली. त्यांचा हा उपक्रम फायद्याचा ठरला. एका झाड (खोड) २४ ची रास बसली.

Farm workers loading bunches of bananas after processing into trucks.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावाचे बनावट WhatsApp Account!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com