Jalgaon: वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली
Guardian Minister Gulabrao Patil laying floral wreath on the body of Veer Jawan Bhanudas Patil.
Guardian Minister Gulabrao Patil laying floral wreath on the body of Veer Jawan Bhanudas Patil.esakal

जळगाव : ‘अमर रहे..., अमर रहे... वीर जवान भानुदास पाटील अमर रहे...’च्या घोषात रविवारी (ता. ३१) सकाळी कुसुंबे (ता. जि. जळगाव) येथे वीर जवान भानुदास कौतिक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही वीर जवान भानुदास पाटील यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा प्रशासनातर्फे जवान पाटील यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाला. (Veer Jawan Bhanudas Patil cremated with state honors Tributes paid by Guardian Minister Rural Development Minister Jalgaon)

भारतीय सैन्य दलातील भूज येथील १२४९ डीएससी (डिफेन्स सिक्युरिटी कॅम्प) प्लाटून ७५ इन्फेंन्ट्री ब्रिगेड येथे जवान भानुदास पाटील (वय ५५) सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा शनिवारी (ता. ३०) आकस्मिक मृत्यू झाला.

दरम्यान, शहीद जवानाची वार्ता कुसुंबा येथे धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी गावी आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन ‘अमर रहे..., अमर रहे... वीर जवान भानुदास पाटील अमर रहे’सह ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत होते.

Guardian Minister Gulabrao Patil laying floral wreath on the body of Veer Jawan Bhanudas Patil.
Nashik News: मालेगावला मालवाहतूक चालकांकडून नियमांचे उल्लंघन; अवजड वाहनांचा सुळसुळाट

वीर जवान भानुदास पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री महाजन, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अर्पित चव्हाण, तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, डिफेन्स सिक्युरिटी कॅम्पचे सुभेदार अवतार सिंह,

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे हवालदार रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे व सुगंध पाटील, सरपंच यमुना ठाकरे, पोलिसपाटील राधेश्याम चौधरी आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दलाने गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा सचिन यांनी मुखाग्नी दिला.

पालकमंत्री म्हणाले, की आपल्या जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनोद पाटील यांच्या कुटुंबीयास महाराष्ट्र शासनातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल.

वीर जवान भानुदास पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट या वेळी उपस्थित होते.

Guardian Minister Gulabrao Patil laying floral wreath on the body of Veer Jawan Bhanudas Patil.
Jalgaon News: विद्यार्थ्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर पाचोऱ्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर! समाजमन संतप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com