Jalgaon Crime News : 55 गुरांसह वाहन जप्त; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील अक्सानगर भागात कत्तलीसाठी आणलेल्या ४० जनावरांना सोडविले, तर दुसऱ्या घटनेत चोरीची १५ जनावरांनी भरलेली दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. एमआयडीसी पोलिसांनी ५५ गुरांची सुटका केली.

मास्टर कॉलनी, पिरजादे वाडा, अक्सानगर, मेहरुण या भागात रविवारी (ता. २५) सकाळी दहाला जनावरांनी भरलेली तीन पीकअप व्हॅन मास्टर कॉलनीकडे जात असताना, एमआयडीसी पोलिसांनी पकडले. (Vehicle seized with 55 cattle Jalgaon Crime News)

यात १५ जनावरांची जनावरांची कोंबून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी शेख राजीक शेख रफिक, शेख रेहान शेख युसूफ (रा. वरणगाव), अदनान कय्युम खान (दत्तनगर, मेहरूण), इफ्तीखार शरीफ खान (मास्टर कॉलनी), सर्फराज रहीम शेख, सय्यद वाजीद सय्यम इब्राहीम (रथ चौक), सय्यद अनीस सय्यद हमीद यांना ताब्यात घेतले.

दुसऱ्या घटनेत अक्सानगर भागात असरार शेख मुक्तार शेख व त्याचा लहान भाऊ पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करताना सापडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
CM Jalgaon Daura : केळीचे लाडू, बिस्कीट, चिप्स मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला! भरताची वांगीही देणार..

संशयितांनी चोरी केलेली ४० जनावरे सापडल्याने त्यांची सुटका करण्यात आली. दोन्ही कारवाईत एकूण ५५ जनावरांची सुटका करण्यात आली, तर ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सय्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, आशा पांचाळ यांनी केली. या गुन्ह्याच्या तपास दत्तात्रय पोटे करीत आहेत. दरम्यान, सुटका केलेली ५५ जनावरे कुसुंबा गोशाळेत रवाना करण्यात आले.

Crime News
Jalgaon News : ‘सुंदर जळगाव’ अंतर्गत न्यायालय परिसर स्वच्छ; 4 टन कचरा संकलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com