Jalgaon Rain News : पावसाअभावी पिके करपू लागली; ‘अल निनो’च्या प्रभावामुळे 2 आठवड्यांपासून प्रतीक्षा

Waiting for Monsoon for 2 weeks due to El Nino effect jalgaon rain news
Waiting for Monsoon for 2 weeks due to El Nino effect jalgaon rain newsesakal

Jalgaon Rain News : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे दोन आठवड्यांपासून ‘मॉन्सून’ कमजोर झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके करपू लागली आहेत.

अनेक ठिकाणी जमिनी कोरड्या होऊन भेगा पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक प्रार्थना करू लागले आहेत. (Waiting for Monsoon for 2 weeks due to El Nino effect jalgaon rain news)

‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पाऊस तब्बल पंचवीस दिवस उशिराने राज्यात दाखल झाला. नंतर मात्र चांगल्या पावसाने जूनमधील पावसाची उणीव भरून काढली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ चांगली होत होती.

मात्र ५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. काही ठिकाणी पावसाची तुरळक हजेरी लागत आहे. उन्ह अधिक पडते. दिवसभर ढगाळ वातावरण असते, मात्र पाऊस पडत नाही.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना पिकांतील तण काढण्यास वेळ मिळाला असला तरी पिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. बागायतदार विहिरीतील पाणी पिकांना देताहेत. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना पिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पाऊस अजून लांबल्यास पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Waiting for Monsoon for 2 weeks due to El Nino effect jalgaon rain news
Nashik Rain News : उत्तर महाराष्ट्र कोरडाच! नांदगाव, मालेगाव, येवला, सिन्नरचे शेतकरी संकटात

‘अल निनो’च्या प्रभावामुळे मॉन्सून कमजोर झाला आहे. यामुळे पाऊस पडत नाही. २० ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नाही. २० ते २१ दरम्यान काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर म्हणजे २५ ऑगस्टनंतर चांगला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान अभ्यास नीलेश गोरे यांनी दिली.

यंदा ९५ टक्केच पेरण्या

यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी ९५ टक्के पेरण्या केल्या आहेत. सर्वाधिक कापूस १०५ टक्के पेरला गेला आहे, असे असताना पावसाने दिलेली ओढ पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करू शकते. पंधरा दिवसांपर्यंत चांगला पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र नंतर पावसाने दिलेल्या ओढीमुळे पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

"पावसाने ओढ दिली असली तरी शेतकऱ्यांनी विहिरीचे पाणी पिकांना द्यावे. जमिनीला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच पिकांवर निंबोली अर्काची फवारणी करावी, रसशोषक अळीसाठी वातावरण चांगले आहे. या अळीचा नायनाट करण्यासाठी निंबोली अर्काचा वापर करावा. चार-पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे."- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Waiting for Monsoon for 2 weeks due to El Nino effect jalgaon rain news
Monsoon Trek Tips: पावसाळ्यात दरी खोऱ्यामध्ये भटकंतीचं वाढतंय प्रमाण! तुम्हालाही जायचंय? ही काळजी घ्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com