Jalgaon News: राज्यातील जल चळवळीचा UNOत डंका! गुणवंत सोनवणे यांनी केले अनुभव कथन

Gunwant Sonwane while giving information about groundwater campaign in the conference of representatives of 39 countries held in the United Nations
Gunwant Sonwane while giving information about groundwater campaign in the conference of representatives of 39 countries held in the United Nationsesakal

Jalgaon News : केवळ खानदेशालाच नव्हे, तर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कार्य कळमडू (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व सध्या पुणे येथे संगणक अभियंता असलेल्या गुणवंत सोनवणे यांनी आपल्या भूजल अभियानाच्या माध्यमातून केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघामध्ये (युनो) ‘शाश्वत विकासावरील उच्चस्तरीय राजकीय मंच’ या कार्यक्रमात ३९ देशांच्या प्रतिनिधींसमोर श्री. सोनवणे यांनी भूजल अभियान या वारकरी संप्रदायाच्या विचारावर सुरू असलेल्या जल चळवळीचे अनुभव कथन केले. (Water movement in state stings in UNO Experience narrated by Gunwant Sonawane Jalgaon News)

भूजल अभियान या वारकरी संप्रदायाच्या विचारांवर आधारीत असलेल्या जल चळवळीचा अनुभव व कामाचा एकूण प्रवास सांगणारा व्हिडिओ अमेरिकेतील न्युयॉर्कमधील ‘युनो’मध्ये दाखविण्यात आला.

भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांनी हा संपूर्ण प्रवास मांडला. १० ते १९ जुलै दरम्यान आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतर्गत पार पडलेल्या या परिषदेत गुणवंत सोनवणे यांनी भूजल अभियानाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा व्हिडिओ पाहून उपस्थित विविध देशांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

अशी आहे भूजल चळवळ

लोकसहभाग आणि सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू झालेल्या भूजल अभियान या चळवळीला मुख्यतः नाम फाउंडेशनसह इतरही विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने वारकरी संप्रदायांच्या विचारावर आधारित लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली चळवळ आहे.

चळवळीच्या चित्रफितीमध्ये सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चळवळीचा प्रवास मांडण्यात आला आहे. याच भूजल अभियानाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील साधारण ४० गावांमध्ये जलसंधारण व जल व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत.

एकंदरीत भूजल अभियानाचे उद्दिष्ट हे गावागावांत जलसाक्षरता निर्माण करणे असून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे व जलसाक्षर भूजल वारकरी निर्माण करणे हे आहे. ही चळवळ खऱ्या अर्थाने भूजल वारकरी व दिंडी प्रमुखांची आहे.

जी लोक प्रत्येक गावातून तसेच चाळीसगाव शहरातून या सहभागातून कार्यरत असल्याचे गुणवंत सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gunwant Sonwane while giving information about groundwater campaign in the conference of representatives of 39 countries held in the United Nations
Nashik News: प्रबोधनासाठी 24 तास ‘ऑन ड्यूटी’! पोलिस हवालदार सचिन जाधव यांनी जपले सामाजिक भान

८० हजार शेतकऱ्यांना फायदा

आतापर्यंत भूजल अभियानाच्या माध्यमातून विविध संस्थांच्या मदतीने व लोकसहभागातून भूपृष्ठावर एकूण ५०० कोटी लिटरपेक्षा जास्त जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. त्याचा साधारण ७० ते ८० हजार शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

‘एक गाव एक तलाव’ या संकल्पनेमुळे उन्हाळ्यात देखील बऱ्याच तलावांमध्ये जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

भूजल चळवळीचे काम

या चळवळीत काम करणारे स्वयंसेवक हे भूजल वारकरी म्हणून ओळखले जातात. गावामध्ये अशा भूजल वारकऱ्यांची ६ ते १० सदस्यांची भूजल पाणी समिती असते. या समितीचा एक प्रमुख असतो, त्याला भूजल दिंडी प्रमुख संबोधले जाते.

भूजल अभियानाच्या पाच वर्षांच्या प्रवासात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्यातील ‘एक गाव एक तलाव’ हा उपक्रम भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी सक्षम ठरला आहे. आतापर्यंत १६ गावांमध्ये २१ तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

याशिवाय वृक्षदिंडी उपक्रमांतर्गत पाच गावांमध्ये साधारणतः २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. तसेच साधारणः २६ किलोमीटर एवढ्या अंतराचे पाणंद रस्ते शेतकऱ्यांसाठी भूजल अभियानातून निर्माण करण्यात आले आहेत.

Gunwant Sonwane while giving information about groundwater campaign in the conference of representatives of 39 countries held in the United Nations
Kavnai Fort: कावनई किल्ल्यावर पर्यटकांना बंदी; ग्रामपंचायतीने लावला मनाईचा फलक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com