Jalgaon Water Shortage : नगरदेवळ्यात 10 दिवसाआड पाणीपुरवठा

Water scarcity
Water scarcityesakal

Jalgaon News : सुमारे ३५ हजारांवर लोकसंख्या असलेल्या नगरदेवळा गावाची पाण्यची समस्या जणू काही ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. सद्यःस्थितीत ग्रामस्थांना आठ ते दहा दिवसाआड पिण्यासाठी पाणी मिळत आहे. (water shortage Water supply in Nagardeola every 10 days jalgaon news)

एकीकडे आकाशातून सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पाणीटंचाईच्या या समस्येची कोणीही दखल घेत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीकडून सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने घरात पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था ग्रामस्थांना करावी लागत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पाणी सोडण्यात आल्यानंतर ऐनवेळी महत्वाची कामे असली तरी बाजूला ठेवून महिलांना घरीच थांबावे लागते.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या अग्नावती प्रकल्पात अत्यंत कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. असे असतानाही काही जण शेतीसाठी अनधिकृतरित्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करीत आहेत. यावर्षी पावसाळा लांबणीवर जाण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. अशा परिस्थितीत ‘अग्नावती’मधून असाच पाणी उपसा सुरु राहिल्यास, भविष्यात नगरदेवळेकरांचा पाणीप्रश्‍न आता आहे, त्यापेक्षाही गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Water scarcity
Jalgaon Cotton Rate : 40 हजार क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांकडून खरेदी; अखेर शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री

मोजकेच कनेक्शन बंद

अग्नावती प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील परवानगीधारक व अवैधरित्या पाणी उपसा करण्यासाठी असलेले वीज संयोजन तोडण्यात यावे, असे पत्रक नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी यापूर्वीच काढले होते. त्यानुसार, सिंचन विभागाने एप्रिल महिन्यात वीज वितरण कंपनीला पत्र देऊन संबंधितांचे वीज संयोजन बंद करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळवले.

त्यानुसार, वीज कंपनीने सर्वच्या सर्व वीज संयोजन बंद करणे गरजेचे असताना मोजकेच कनेक्शन बंद केले आहेत. त्यामुळे आजही अग्नावती प्रकल्पातून विद्युत पंपांद्वारे शेतीसाठी काही जण पाण्याचा उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे, आमदार किशोर पाटील यांनी देखील याबाबतीत सूचना केलेल्या होत्या.

मात्र, वीज कंपनीने पाहिजे तशी कार्यवाही न केल्यामुळे आजही अवैधरित्या पाण्याचा उपसा सुरुच आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, अग्नावती प्रकल्पातून एकाही वीज पंपाद्वारे उपसा होणार नाही, यादृष्टीने वीज कंपनीने कोणताही दुजाभाव न करता किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता, सरसकट सर्वच्या सर्व वीज पंप जप्त करावे, जेणेकरुन ग्रामस्थांना पुरेसे पाणी देणे ग्रामपंचायतीला शक्य होईल, अशी मागणी होत आहे.

"अग्नावती प्रकल्पासून होणारा अनधिकृत पाण्याचा उपसा बंद करण्यासंदर्भात सिंचन विभागाने ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांनी शासनाच्या आदेशाची योग्य ती अंमलबजावणी केली तर हा उपसा थांबेल व ग्रामपंचायतीला ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही." - तुकाराम मराठे ः ग्रामविकास अधिकारी, नगरदेवळा (ता. पाचोरा)

Water scarcity
Jalgaon Water Scarcity : टंचाईच्या झळा होताहेत अधिक गडद...! धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com