
सावद्यात 3 दिवस पाणीपुरवठा बंद : Jalgaon
सावदा (जि. जळगाव) : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीत सावदा रेल्वेस्थानकाजवळ बिघाड होऊन गळती लागली आहे. पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सावद्यात बुधवार (ता. २२)पासून तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक प्रांताधिकारी कैलास कडलग आणि मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.
मांगलवाडी येथून सावदा शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवहिनीला रेल्वे रूळाखाली गळती लागली आहे. गेल्या आठवड्यातही जलवहिनीला गळती लागली होती. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सावदा शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक कैलास कडलक, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा: 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये : कृषी विभाग
हेही वाचा: खरिपाच्या पेरण्या 97 हजार हेक्टरवर पूर्ण
Web Title: Water Supply Cut Off For 3 Days In Savda Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..