Jalgaon Crime News : सततच्या मारहाण, संशयाला कंटाळून पत्नीनेच केला मद्यपी पतीचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : सततच्या मारहाण, संशयाला कंटाळून पत्नीनेच केला मद्यपी पतीचा खून

वरणगाव : मद्यपी पतीसोबत संशय घेण्याच्या वादातून भांडण झाले व भांडणाचे रुपांतर हाणामारीत होऊन संतापलेल्या पत्नीने घरात कोणी नसल्याचे पाहून विळ्याने डोक्यावर वार करून पतीला ठार केल्याची घटना पाचदेवळी (ता. बोदवड) गावात रविवारी (ता. ११) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Jalgaon News : शेती पाइपलाइनसाठी आणलेल्या उसनवार पैशांवर चोरट्यांचा डल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दगडू पुंडलिक सुरवाडे हा शेती व मजुरी करीत असते. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो दारू पिऊन पत्नी आशा सुरवाडे हिला मारहाण करीत असे. तसेच अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शिवीगाळ करीत असे. मृताची मुलगी समीक्षा दगडू सुरवाडे (वय १७ ) हिने याबबत फिर्याद दिली असून, आई-वडिल बहिण पूजा व भाऊ विनायक असे कुटुंब वास्तव्यास असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

तसेच रविवारी (ता. ११) सुटी असल्याने मी व माझे लहान बहिण, भाऊ घरीच असताना वडील दगडू सुरवाडे हे सकाळीच शेतात कामाला गेले होते. दुपारी घरी येऊन सायंकाळी पाचला पुन्हा गावात गेले. जेव्हा ते परत आले, त्यावेळी ते दारु प्यायलेले होते. त्यांच्यात व आईमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. नेहमीचे त्यांचे भांडण असल्याने आम्ही बहिण, भावंडांनी त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही बाहेर काकूचे घराजवळ शेकोटीजवळ बसण्यासाठी गेलो होतो.

हेही वाचा: Jalgaon News : पत्नी विरहातून नैराश्यग्रस्त पतीने मृत्युला कवटाळले

नंतर रात्री सुमारे साडेआठला घरी जेवणासाठी गेले तेव्हा घरातून जोरजोराचा आवाज ऐकू येत होता. तेव्हा घरात जाऊन पाहिले असता आई आशाबाई हिच्या हातात विळा होता व ती विळ्याने वडिलांच्या डोक्यावर जोराजोरात मारत होती. तेव्हा वडील मारू नको, असे बोलत होते. घरातील खाटेवर व आजूबाजूला रक्त पडलेले होते. तेव्हा मी आईचा हात धरुन तिला घराबाहेर घेऊन आले, तिच्या हातातील विळा फेकायला लावला, तिने परत विळा घेऊन पुन्हा घरात गेली व स्वयंपाक घरात बसून होती.

मी आरडाओरड करून वाड्यातील लोक जमा करून मी काकू रंजनाबाई हिच्याकडे गेले गावातील पोलिस पाटील व ग्रामस्थांनी वरणगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १२) सकाळी माहिती दिल्यावरून वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आशा सुरवाडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; संशयितास पोलिस कोठडी