Winter Solstice : आजची रात्र वर्षातील सर्वांत मोठी! जाणुन घ्या

This diagram shows the reason for the difference between day and night.
This diagram shows the reason for the difference between day and night.esakal

जळगाव : पृथ्वी सूर्याभोवती आपली एक फेरी ३६५.२५ दिवसांत पूर्ण करते. ज्याला एक ‘सौरवर्ष’, असे म्हणतात. या सौरवर्षात प्रत्येक दिवस आणि रात्रीच्या काळात फरक पडतो. त्या मालेत २२ डिसेंबरचा दिवस सर्वांत लहान असतो, तो गुरुवारी (ता. २२) आहे. (Winter Solstice Tonight biggest night of year jalgaon News)

सौरवर्षात कधी दिवस लहान किंवा मोठा असतो, तर कधी रात्र. याचबरोबर आपल्याला विविध ऋतू बघायला मिळतात. विविध ऋतू आणि दिवस-रात्र एकसमान न राहण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचा २३.५ अंशातून झुकलेला अक्ष (Axis). पृथ्वीचे मुख्य उत्तर व दक्षिण गोलार्ध, असे दोन भाग आहेत.

पृथ्वी सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करीत असताना, झुकलेल्या अक्षामुळे कधी उत्तर गोलार्ध सूर्यासमोर येतो, तर कधी दक्षिण गोलार्ध. यामुळे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश दोन्ही गोलार्धात एकसमान पडत नाही. कधी सरळ, तर कधी तिरपा पडतो.

This diagram shows the reason for the difference between day and night.
सीमावर्ती आदिवासी भागात धवलक्रांती !

त्यामुळे दिवस-रात्र लहान-मोठी आणि विविध ऋतू आपल्याला बघायला मिळतात. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात एकाच वेळी दोन वेगवेगळे ऋतू सुरू असतात. दिवस-रात्रीत होणारे बदल आणि ऋतूचक्राची सुरवात पृथ्वी, सूर्याभोवती आपल्या कक्षेत फिरताना चार महत्त्वाच्या बिंदूंवर आली की होते. जसे २१ मार्च ‘वसंतसंपात बिंदू’ (Spring Equinox), २१ जून ‘विष्टंभ बिंदू’ (Summer Solstice), २२ सप्टेंबर ‘शरदसंपात बिंदू’ (Autumnal Equinox), २२ डिसेंबर ‘अवष्टंभ बिंद’ (Winter Solstice).

त्यानुसार पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याच्या प्रवासातला २२ डिसेंबर हा महत्त्वाचा बिंदू याला ‘अवष्टंभ बिंदू’ (Winter Solstice), असे म्हणतात. यादिवशी उत्तर गोलार्ध दूर असल्याने त्यावर पडणारा सूर्यप्रकाश तिरपा पडतो. त्यामुळे तापमान कमी होते, म्हणून तेथे हिवाळा ऋतू असतो. तिरप्या पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे उत्तर गोलार्धातील २२ डिसेंबर हा दिवस सगळ्यात लहान (११ तासांचा) आणि रात्र सगळ्यात मोठी (१३ तासांची) असते.

This diagram shows the reason for the difference between day and night.
Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा हादरा! संजय राऊतांच्या जामीनदाराचीच हकालपट्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com