Crime
sakal
जळगाव - येथील पिंप्राळा हुडको भागातील संविधान चौकात जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून २८वर्षीय तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत दोन्ही संशयितांना अटक केली आहे.