युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, संचालकांत बाचाबाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, संचालकांत बाचाबाची

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, संचालकांत बाचाबाची

बोदवड : युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील व बाजार समिती संचालक रामदास पाटील यांच्यात शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाब्दिक चकमक उडाली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.

आगामी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी (ता. १५) प्रा. पाटील यांनी रामदास पाटील यांच्याबद्दल अर्वच्च भाषेत अकबर जलील मुलतानी यांच्याजवळ वक्तव्य केले. याबाबत रामदास पाटील यांनी प्रा. पाटील यांना भ्रमणध्वनीवरून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही. त्यानंतर शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुन्या तहसीलसमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील आले असता, बाजार समिती संचालक रामदास पाटील यांनी जाब विचारला असता, त्यांच्यात वाद झाला. वाद थेट बोदवड पोलिस ठाण्यात पोचला.

अडीचशे कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर

प्रा. हितेश पाटील व रामदास पाटील यांच्यात वाद झाल्याची वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरत दोघांच्या समर्थकांनी थेट पोलिस ठाणे गाठले. दोन्ही गटाचे जवळपास २०० कार्यकर्ते जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत जमाव पोलिस ठाण्याबाहेर उभा होता. यात प्रामुख्याने गटनेता कैलस चौधरी, नगरसेवक दीपक झांबड, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, गणेश पाटील आदींचा समावेश होता.

हेही वाचा: नाशिक : गणेश विसर्जनावेळी पोलिसांकडून वाद्ये जप्त

मनोमीलनाचा प्रयत्न अयशस्वी

या प्रकरणी जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड पोलिस ठाणे गाठत परिस्थितीचा आढाव घेत तब्बल तासभर थांबून होत्या. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या दालनात प्रा. हितेश पाटील व रामदास पाटील यांच्या मनोमीलनाचा प्रयत्न झाला. मात्र, यात अपयश येत अखेर रामदास पाटील व हितेश पाटील यांनी फिर्याद दिल्याने परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: 'छा_गयी_योगी_सरकार' ट्विटरवर का होतंय ट्रेंड?

प्रा. हितेश पाटील यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुन्या तहसीलजवळ माझ्या गाडीवर हात व दगड मारत ठार मारण्याची धमकी दिली, असा जबाब पोलिस ठाण्यात लिहून दिला. रात्री नऊच्या सुमारास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी पोलिस ठाणे गाठत दोघांमध्ये समेट घडवून आणला, तोपर्यंत दोघांविरोधात परस्पर गुन्हा दाखल झाला होता. किशोर गायकवाड, उद्धवराव पाटील, मधुकर राणे, गजानन खोडके, दीपक माळी, हर्षल बडगुजर, प्रदीप बडगुजर, रवी खेवलकर, बाळू पाटील, भरत पाटील, गोपाल गंगतिरे, अनिल वर्षे, नीलेश पाटील, कलिम शेख आदी दोघे बाजूने उपस्थित होते.

Web Title: Youth Congress District President And Bajar Samiti Chairman Clash

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rohini Khadse