Jalgaon News : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

youth died in well due to drowning jalgaon news
youth died in well due to drowning jalgaon newsesakal

Jalgaon News : येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवासी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा ११ वी मध्ये अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ( youth died in well due to drowning jalgaon news)

१६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला सुट्टी असल्याने शुभम व त्याचे काही मित्र शहरातील गलवाडे रस्त्यावरील नियोजित साने गुरुजी स्मारकालगतच्या खदानी जवळील विहिरीत पोहण्यासाठी गेले असता शुभमचा बुडून मृत्यू झाल्याचे समजले.

सायंकाळी ४ पासून शुभमचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते, पट्टीचे पोहणाऱ्यांनी प्रयत्न केल्यावर ही विहिरीतील शुभमचा मृतदेह हाती लागत नसल्याने धुळे येथून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. रात्री साडेदहा वाजता विहिरीतील गाळात फसलेला मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

youth died in well due to drowning jalgaon news
Jalgaon Accident News : हॉटेल साई पॅलेसजवळ बस-दुचाकी अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. विच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शुभमचे वडील पारोळा येथील गोविंद शिरोडे यांच्या फटाका कारखान्यात कामाला आहेत.

धुळे येथील एनडीआरएफ टीमसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार एकनाथराव खडसे, आमदार चिमणराव पाटील यांनी सहकार्य केले. दुपारपासून घटनास्थळी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे हे लक्ष ठेवून होते.

youth died in well due to drowning jalgaon news
Jalgaon News : 17 वर्षीय युवतीचा विहिरीत पडून मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com