Jalgaon: हलखेडा येथे तरुण बुडाला; दुसऱ्याला नाचताना ‘हार्ट ॲटॅक’, क्ताईनगर तालुक्यात विसर्जनावेळी घडल्या घटना

Death
Deathesakal

मुक्ताईनगर/ कुऱ्हा काकोडा : तालुक्यात हलखेडा येथे गणेश विसर्जनास गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून, तर दुसऱ्याचा ‘डीजे’च्या दणदणाटात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटना गुरुवारी (ता. २८) घडल्या. (Youth drowned at Halkheda Heart attack while dancing to another incidents happened during immersion in Katainagar taluka Jalgaon)

अनंत चतुर्दशीनिमित्त गुरुवारी जिल्ह्यात आपल्या लाडक्या बाप्पाला उत्साहात, भावपूर्ण निरोप दिला जात होता. मात्र, सायंकाळी तालुक्यातील हलखेडा येथे गणेश विसर्जनादरम्यान तरुण बुडाल्याची घटना रात्री उघडकीस आली.

फिरीजखान गव्हाणसिंग पवार (वय ३०) आपल्या घरातील गणेशमूर्ती घेऊन सिनफाटाजवळील शासकीय पाझर तलाव येथे गेला होता. तेथे पाय घसरल्याने तो पाण्यात पडला.

सरपंच, पोलिसपाटील व स्थानिकांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र, अंधार असल्याने शोधकार्यात अडथळा येत असल्याने शुक्रवारी (ता. २९) सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ‘एनडीआरएफ’ची एक टीम याठिकाणी पाचारण केली.

Death
Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत सुतळी बॉम्ब उडाला अन् तो डोळाच गमावून बसला; रक्तबंबाळ अवस्थेत त्यानं..

या वेळी त्यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शासनातर्फे लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल, असा धीर आमदार पाटील यांनी दिला.

‘डीजे’वर नाचताना हृदयविकाराचा झटका

दुसऱ्या घटनेत मुक्ताईनगर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक भुसावळ रोडवर आली असता एका मंडळाचा तरुण कार्यकर्ता भूषण रामदास झांबरे हा डीजेच्या दणदणाटात नाचता-नाचता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने भोवळ येऊन जमिनीवर कोसळला.

त्याला इतर कार्यकर्त्यांनी जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. रामदास रामचंद्र झांबरे यांचा तो मुलगा होत.

Death
Nashik Heavy Rain: मुकणे धरणात चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्मचे उडाले शेड; 250 कोंबड्यांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com