Jalgaon ZP CEO : निवृत्तांना चकरा माराव्या लागणार नाहीत : सीईओ अंकित

zp ceo ankit statement about Retirees should not have to go round office jalgaon news
zp ceo ankit statement about Retirees should not have to go round office jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon ZP News : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून, निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी उपायोजना करणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी व्यक्त केला. (zp ceo ankit statement about Retirees should not have to go round office jalgaon news)

जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात मंगळवारी (ता. २५) झालेल्या पेन्शन अदालतीत ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. अंकित यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

दुपारी श्री. अंकित यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशनची कामे सुरू नाहीत, त्यांना काय अडचण आहे, याची माहिती जाणून घेऊन कामे मुदतीत सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

zp ceo ankit statement about Retirees should not have to go round office jalgaon news
Jalgaon District Collector : जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंची बदली; यांची नियुक्ती..

जिल्हा परिषदेचा अर्थ व सामान्य प्रशासन विभागाकडील प्रलंबित कामांचा आढावाही त्यांनी घेतला. शिक्षक भरतीसंदर्भात तयार केलेल्या बिंदूनामावलीबाबत चर्चा करून त्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.

श्री. अंकित सोमवारी (ता. २४) जिल्हा परिषदेत रूजू झाल्यानंतर त्यांनी बैठकांचा धडाका लावला असून, विविध विभागांचा आढावा घेत आहेत. मंगळवारी (ता. २५) दुपारी विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू होत्या. मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजताच श्री. अंकित कार्यालयात पोहोचल्याने सकाळपासूनच जिल्हा परिषद प्रशासन सतर्क मोडमध्ये होते.

zp ceo ankit statement about Retirees should not have to go round office jalgaon news
Jalgaon ZP CEO : तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट क्लासरूम करण्यावर भर : सीईओ अंकित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.