esakal | BEL मध्ये पदवीधर इंजिनिअर्सना अप्रेंटिसशीपची संधी, जाणून घ्या डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

BEL Recruitment

BEL Recruitment : पदवीधर इंजिनिअर्सना अप्रेंटिसशीपची संधी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

BEL Recruitment 2021 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) गाझियाबाद युनिटने वर्षभर चालणाऱ्या प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी (apprenticeship training) अर्ज मागवले आहेत. या नोटीफिकेशननुसार 50 पेक्षा जास्त रिक्त पदांवर उमेदवारांनांना संधी दिली जाणार आहे. हे पद कागही विशिष्ट शाखांमध्ये बीटेक (BTech) किंवा बीई (BE) पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आहे. त्यामुळे काही ठरावीक उमेदवारच यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार हे अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट आहे.

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 11,110 रूपये पगार मिळेल. फक्त 25 वर्षे वय असलेल उमेदवार अनारक्षित प्रवर्गातील प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात, इतर मागासवर्गीय (OBC) असलेल्यांनात्यांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि अपंग व्यक्तींना पाच वर्षांची सूट दिली जाईल.

हेही वाचा: IDBI बँकेत 920 पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज

अर्ज कसा करावा

  • राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (National Apprenticeship Training Scheme )

  • होमपेजवर 'एनरोल' वर क्लिक करा आणि तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळवण्यासाठी आवश्यक तपशील एंटर करा

  • आता होमपेजवर परत जा आणि लॉगिनवर क्लिक करा

  • तुमची माहिती एंटर करा आणि लॉगिन करा

  • प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी अर्जासह एक नवीन पेज उघडेल

  • आता हा फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा

  • एकदा सर्व तपशील क्रॉस-चेक करा आणि सबमिट दाबा

  • यशस्वीरित्या सबमिट केलेले पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या

ज्या उमेदवारांनी computer science, electronics, mechanical आणि civil engineering disciplines या शाखेत बीटेक (BTech) किंवा बीई (BE) केले आहे तेच या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. 10 पदे कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल इंजिनीअर्ससाठी उपलब्ध आहेत आणि 20 मेकॅनिकल इंजिनीअर्ससाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा: टाटाची जिओला टक्कर, सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस होतेय लाँच

loading image
go to top