DRDOमध्ये १५० पदांसाठी भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

drdo recruitment
drdo recruitmentesakal

DRDO Recruitment 2022: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या गॅस टर्बाइन रिसर्च ऑर्गनायझेशन (GTRE) मध्ये अप्रेंटिसच्या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अभियाना अंतर्गत, ग्रॅज्युएट अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस, आणि, आयटीआय अप्रेंटीस ई. रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. जे योग्य आणि इच्छूक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छितात त्यांन अधिकृत वेबसाईटला भेट द्या, mhrdnts.gov.in आणि apprenticeshipindia.gov.in वर जाऊन लवकरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

drdo recruitment
Apple चा रशियाला मोठा झटका, अनेक उत्पादनांची विक्री केली बंद

कोण करू शकते अर्ज?

गॅस टर्बाइन रिसर्च ऑर्गनायझेशसाठी(GTRE) अप्रेंटीस भरती प्रक्रियेतंर्गत जे उमेद्वार ग्रॅज्यूएट, डिप्लोमा आणि ITI ट्रेड डिप्लोमा केला आहे ते अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड प्रक्रिया अॅकडेमिक मेरिट, लेखी परिक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारावर केली जाईल.

drdo recruitment
बीएसएफमध्ये बंपर भरती; 2788 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

DRDO Recruitment 150 पदांसाठी होणार भरती

डीआपडीओ जीटीआरई अप्रेंटीसची भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्यूएट अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिसचे एकूण १५० रिक्त पदांसाठई भरती होणार आहे. भरतीसंबधीत इतर महत्तवाची माहिती आणि योग्यता नियमांबाबत जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध अधिसूचन पाहू शकता.

क्रं. पद श्रेणी एकूण पदे

१. ग्रॅज्यूएट अप्रेंटीस ट्रेनी ७५

२. डिप्लोमा अप्रेंटीस ट्रेनी २०

३. आयटीआय अप्रेंटीस ट्रेनी २५

४. ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी (जनरल स्टीम) ३०

drdo recruitment
JEE Main 2022 परीक्षा दोन टप्प्यात; तारखा जाहीर

DRDO Recruitment GTRE भरती संबधीत महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारखी १४ मार्च २०२२

शॉर्टलिस्ट उमेदवाराची मुलाखत आणि लेखी परिक्षा - २५ मार्च २०२२

GTRE अप्रेंटिसमध्ये सामील होण्याची स्वीकृती तारीख - मार्च 31, 2022

अंतिम निवडलेल्या उमेदवारांच्या यादीची संभाव्य तारीख - 22 एप्रिल 2022

GTRE मध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून सामील होण्याची तारीख - 02 मे 2022

drdo recruitment
जेईई-मेन परीक्षा : रजिस्ट्रेशन प्रोसेस १ मार्चपासून सुरू होणार

DRDO Recruitment साठी अर्ज करण्याची प्रक्रिया

उमेदवार खाली दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून अर्ज करू शकता.

  • सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाईट mhrdnats.gov.in आणि apprenticeshipindia.gov.in

  • आता होम पेजवर दिल्या जाणाऱ्या अप्रेंटिस भरतासंबधी लिंकवर क्लिक करा

  • येथे नवीन पेजवर मागितल्या जाणारी माहिती नोंदवून आपली नोंदणई करा.

  • आता आपला आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करा

  • आता सर्व महत्त्वाची माहिती नोंदवा आणि कागजपत्र अपलोड करा

  • आता अर्जासाठी शुल्क भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा

  • अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून जवळ ठेवाॉ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com