Extra Earning: घरबसल्या दर महिन्याला करा जादा कमाई, ट्राय करा 'या' पाच आयडिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

extra earning

Extra Earning: घरबसल्या दर महिन्याला करा जादा कमाई, ट्राय करा 'या' पाच आयडिया

हल्ली पगारासोबत आपला खर्चही वाढत जातो त्यामुळे एवढ्याश्या पगारात घर कसं सांभाळावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मात्र आज आम्ही तुम्हाला घरबसल्या दर महिन्याला जास्तीची कमाई कशी करावी, याविषयी सांगणार आहोत.

जर तुम्ही या पाच आयडीयापैकी एखादी गोष्ट फॉलो केली तरी तुम्ही घरी बसून जादा कमाई करू शकता. चला जाणून घेऊया त्या पाच आयडिया कोणत्या?

 ड्रॉपशिपिंग

ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही. प्रोडक्ड किंवा सेवा आपल्या स्टोअर हाऊस मध्ये न ठेवता ग्राहकाकडून आलेली ऑर्डर ही आपल्या सप्लायर्स कडे दिली जाते व सप्लायर्स पुढे पॅकिंग आणि शिपिंग तसेच डिलीवरीची जबाबदारी घेवून ग्राहकांना ऑर्डर नुसार प्रोडक्ड पुरवतात, यालाच ड्रॉपशिपिंग म्हणतात.

कला किंवा कौशल्य

प्रत्येकांमध्ये काही ना काही कला किंवा कौशल्य असतात. या मदतीनेही तुम्ही जादा कमाई करू शकता. मग डान्स शिकवणे, चित्रकला, मेहंदी किंवा रांगोळी क्लासेस इत्यादी. यामुळे तुमच्या कला गुणांना वाव मिळेल आणि आवडीचं काम करत असल्याचं समाधानही मिळणार.

हेही वाचा: Job Opportunity : सरकारी पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

एफिलिएट मार्केटिंग 

जेव्हा तुम्ही एखाद्या ऑनलाईन कंपनीचे प्रॉडक्ट्स तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाऊंट च्या माध्यमातून ऑनलाईन विकता. तेव्हा त्या प्रॉडक्ट्स च्या विक्रीमधून जे काही टक्के कमिशन मिळते. त्याला एफिलिएट मार्केटिंग  म्हणतात. यात तुम्हाला बराच नफा मिळू शकतो.

ट्युशन

तुम्ही एखाद्या विषयात निपूण असाल तर तुम्ही टयुशन घेत घरबसल्या जादा कमाई करू शकता. तुम्ही विविध विषयाचे ट्युशन तसेच इंग्लिश स्पिकींग क्लास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखा कोर्स तुम्ही शिकवू शकता. यातून तुम्हाला भरघोस नफा मिळू शकतो.

हेही वाचा: Bank Job : बेसिन कॅथलिक बँकेत विविध रिक्त पदांवर भरती सुरू

 डेटा एन्ट्री

डेटा एन्ट्री खूप प्रकारचे असतात. या माध्यमातून तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता. अनेक वेबसाइट्स घरबसल्या डेटा एन्ट्रीचे काम देतात.

टॅग्स :moneyEarningbusiness idea