esakal | दुर्गम भागात संघर्षमय जीवन जगणाऱ्या आदिवासींना 'श्रमजीवी'चा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Tribal Family

कोरोना कालावधीत कोणी उपाशी राहू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यास सातारा जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे.

दुर्गम भागात संघर्षमय जीवन जगणाऱ्या आदिवासींना 'श्रमजीवी'चा आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना काळात (Coronavirus) आदिवासी भागातील नागरिकांचा उदनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याची बाब लक्षात घेऊन बाळासाहेब कोळेकर संस्थापक असलेल्या श्रमजीवी जनता सहायक मंडळ राममळा (ता. पाटण) या संस्थेने श्री. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी, धोम, तारळे, कोयना, कण्हेर, कृष्णा खोरे व धरण परिसरातील दुर्गम भागात उपजीविका करून संघर्षमय जीवन जगणाऱ्या सुमारे एक हजार गरजू आदिवासी कुटुंबांना (Tribal Family) अन्नधान्य किट (Food Grains) वाटप करण्यात आले. (Distribution Of Foodgrains To Poor People And Tribal Families In Satara Phaltan Kelghar Kas Areas)

आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप उपक्रमात श्रमिक संस्थेचे संस्थापक आदिनाथ ओंबळे व संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय कुंभार, प्रताप गोरे, लहु तरडे, हौश्या मुकणे, कांताराम जाधव यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी गरजूंना साहित्य मेणवली, सिध्दनाथवाडी, रामेश्वरवाडी, कोंढावळे, मेढा (गांधीनगर), आसणीतळ, बोंडारवाडी, भुतेघर, तारळे आदिवासी वस्ती, मामुर्डी, महिगाव, धामणेर, कोर्टी, शेंद्रे, आरळे, लिंब, कण्हेर धरण, धोम धरण, कृष्णाकाठ, कोयनाकाठ, तारळीकाठ व धरण परिसरातील सुमारे ४० पेक्षा अधिक आदिवासी कातकरी पाड्यात देण्यात आले. या वस्त्या वाई, जावळी, पाटण, कोरेगाव, कऱ्हाड व सातारा तालुक्यांतील आहेत.

हेही वाचा: सावधान! तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची घंटा; जावळीत 13 मुलांना कोरोनाची लागण

'लोकमान्य'चा मदतीचा हात

फलटण शहर : कोरोना कालावधीत कोणी उपाशी राहू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत लोकमान्य उद्योग समूहाच्या वतीने डॉ. बी. के. यादव यांनी अन्न धान्य साहित्याचे वाटप केले. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे परिस्थिती हलाखीची बनलेली आहे. फलटण तालुक्यामधील हमाल, मजूर, झोपडपट्टीतील गोरगरीब नागरिक यांना रोजगार नाही. शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा हे नागरिक लाभ घेत असून, शासनाच्या शिवभोजन थाळीच्या (Shiv Bhojan Thali Scheme) उपक्रमास लोकमान्य उद्योगसमूहाच्या अंतर्गत असलेल्या सूर्या एच. पी. गॅस एजन्सीच्या माध्यमातून तांदूळ, तेल, डाळी व मसाले अशा अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. या वेळी लोकमान्य उद्योगसमूहाचे संस्थापक डॉ. बी. के. यादव, व्यवस्थापक अमोल जगताप, काकडे, कुंभार, चांडक व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: बामणोली-तापोळ्याला स्पीडबोट ॲम्बुलन्‍स द्या; खासदार पाटलांच्या 'आरोग्य'ला सूचना

Distribution Books

Distribution Books

जावळीत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

केळघर : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी मनसेच्या वतीने जावळी तालुक्यातील गरजू १०० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. त्याबरोबरच पोलिस बांधवांना एन-९५ मास्क व पाणी बॉक्सही वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जावळी तालुकाध्यक्ष अविनाश दुर्गावळे, जावळी तालुका संघटक नितीन पवार, समीर गोळे, खारघर मनसे विभाग अध्यक्ष सागर सुर्वे, अमोल मालुसरे, जयेश कांबळे, विशाल चिकणे, अविनाश साळुंखे, सुनील शिंदे, शुभम विधाते, अमर महामुलकर, अक्षय रांजणे, चेतन पवार, गणेश पवार, विकी रांजणे, विजय पवार यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.

Food Grains

Food Grains

कास : म्हावशीचे रहिवाशी व ग्रुप ग्रामपंचायत बामणोलीचे माजी सरपंच कृष्णा विठ्ठल शिंदे यांच्या सौजन्याने त्यांचे पुत्र धर्मेंद्र कृष्णा शिंदे यांनी बामणोली विभागातील अंधारी, फळणी, उंबरी, चोरगे, उंबरीवाडी, कास, कोरघळ, आंबवडे, मुनावळे, खिरकंडी, बामणोली, पावशेवाडी, म्हावशी, सावरी, तेटली, पिसाडी इत्यादी गावांतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना ६०० फुलस्केप वह्यांचे वाटप केले. या कार्यक्रमास विजय सिंदकर, विजय भोसले गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. धर्मेंद्र शिंदे यांच्या या कार्याचे गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, अंधारी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक मनुकर यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी अंधारी केंद्रातील शिक्षक संतोष उदम, बाबूराव भोसले, नितीन साळुंखे, थोरात, काळेल, गुरव, यशवंत कदम व गणपत कदम उपस्थित होते.

Distribution Of Foodgrains To Poor People And Tribal Families In Satara Phaltan Kelghar Kas Areas

loading image
go to top