esakal | कोरोनाकाळात माणुसकीचं दर्शन; मुस्लिम समाजानं जपली सामाजिक बांधिलकी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahimatpur

रहिमतपूर नगरीत मुस्लिम समाज आपत्तीप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात नेहमीच अग्रेसर असतो.

कोरोनाकाळात माणुसकीचं दर्शन; मुस्लिम समाजानं जपली सामाजिक बांधिलकी

sakal_logo
By
इम्रान शेख

रहिमतपूर (सातारा) : सध्या कोरोनाकाळात (Coronavirus) विविध माध्यमातून माणुसकीचे दर्शन घडताना दिसत आहे. रहिमतपुरातील मुस्लिम समाज व खिदमत ए खल्क समितीच्या वतीने (Muslim Community) कोरोना केअर सेंटरला (Corona Care Center) हजारोंचे अन्नधान्य व गरजू कुटुंबाना महिनाभर पुरेल एवढे रेशनचे वाटप करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्त करण्यात आले. या वेळी वासुदेव माने, अविनाश माने, दीपक नाईक व विद्याधर बाजारे उपस्थित होते. (Distribution Of Foodgrains To The Citizens On Behalf Of The Muslim Community At Rahimatpur)

रहिमतपूर नगरीत मुस्लिम समाज आपत्तीप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात नेहमीच अग्रेसर असतो. खिदमत ए खलकच्या माध्यमातून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले असल्याचे सुनील माने यांनी नमूद केले. लॉकडाउनमुळे (Lockdown) हातावरचे पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. कित्येकांची उपासमार सुरू आहे. अशा गरजूंची यादी काढून साताऱ्यातील खिदमत ए खल्कच्या मार्गदर्शनानुसार येथील खिदमत ए खल्क समितीने गरजूंना महिन्याच्या रेशनचे वाटप सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड (Police Ganesh Kad) यांच्या हस्ते करण्यात आले. समितीने या उपक्रमाचे गणेश कड यांनी कौतुक केले. येथील मुस्लिम समाज व ताब्लिग जमातीचे अमीर सहाब, अबीदभाई सिद्दिकी, रहिमतपूरच्या समितीचे प्रमुख व हाजी मेहमूद, ईनुस शेख, शकील आतार, सय्यद सर, सोहेल आतार, मन्सूर मुल्ला, जमाल डांगे आदी या उपक्रमात सहभागी झाले होते. फिरोज मुल्ला यांनी आभार मानले.

हेही वाचा: "कोव्हॅक्‍सिन' लस आली रे! दूस-या डाेससाठी नागरिक केंद्रावर

पायपीट करून दिला मदतीचा हात

सातारा : राजेश कानिम, धनंजय अवसरे, हेमंत लंगडेंसह अन्य युवकांनी जीवनावश्‍यक वस्तूंचे किट पाठीवर घेत चक्क सहा किलोमीटर चालत जाऊन चाळकेवाडी परिसरातील दुर्गम देऊर, ढेबेवाडी, तळदेव, मायणी, वेळे- ढेण या वाड्या-वस्त्यांतील कुटुंबांना दोन आठवडे पुरेल एवढे अन्न धान्य आणि भाजीपाल्याचे वाटप केले. कोरोनाच्या सावटाची झळ दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसली आहे. मोलमजुरी बंद आहे. शहरात जाऊन रानमेवाही विकता येत नाही. या कुटुंबाना मदतीची गरज होती. या कुटुंबापर्यंत मदत पोचवायची असे राजेश कानीम आणि त्यांचा सहकाऱ्यांनी ठरवले. या युवकांना गीता अगरवाल, मेधा जोशी, वैशाली केतकर, योगेश जाधव, संदीप शिकारखाने, राहुल वखारी, चंद्रशेखर पाटील, अनुप साठे, मंदार पुरोहित, उमेश कुलकर्णी, शैलेश करंदीकर, मंदार गानू, सचिन अष्टुरकर, मिलिंद हबळे, चिंतामणी अष्टेकर, अमर करंदीकर, डॉ. महेश देशपांडे, व्ही. एल. आठवले यांनी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केले.

हेही वाचा: 'कुटुंबांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू'

Satara

Satara

त्यातून सर्व जीवनावश्‍यक वस्तूंचे एका कुटुंबाला किमान आठवडाभर पुरेल असे किट तयार केले. संबंधित गावांना पाच- सहा किलोमीटर चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हे किट चालत वाहून नेण्यास प्रज्ञा अवसरे, समुद्धी कानिम, तनया कानिम, श्रेया भोसले, जयदीप ताटके, प्रशांत बोरा, राहुल वखारिया, प्रनित बोरा, साहील अवसरे, प्रशांत लंगडे, सुहास शिंदे, सूर्यकांत अदाटे, आकाश रांजणे आणि सह्याद्री प्रकल्प कार्यालयातील अधिकारी मोहन शिंदे, आत्माराम माने आणि वनरक्षकांनी सहकार्य केले. हे किट मिळाल्याने दुर्गम भागातील नागरिकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. आता बामणोली भागातील 3 गावांतील गरजूंना किटचे वाटप करणार असल्याची माहिती या युवकांनी दिली.

Distribution Of Foodgrains To The Citizens On Behalf Of The Muslim Community At Rahimatpur

loading image
go to top