"कोव्हॅक्‍सिन' लस आली रे! दूस-या डाेससाठी नागरिक केंद्रावर; 18 ते 44 वयाेगटातील 10 लाख नागरिक पहिला डोसच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

"कोव्हॅक्‍सिन' लस आली रे! दूस-या डाेससाठी नागरिक केंद्रावर

सातारा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशींची (covi19 vaccine) उपलब्धता अल्प प्रमाणात होत असल्याने लसीकरणाची (vaccination) गती मंदावल्याचे दिसून येत होते. मात्र, सद्य:स्थितीत लशींचा साठा उपलब्ध होत असून, "कोव्हॅक्‍सिन'चा (covaxin) पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची मुदतही संपत आली आहे. त्यामुळे रविवारपासून जिल्ह्यात "कोव्हॅक्‍सिन' घेतलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दुसरा डोस सुरू झाला आहे. मात्र, दुसरा डोस केवळ जिल्ह्यातील नऊ उपजिल्हा रुग्णालये आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (primary health center) उपलब्ध असणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 37 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आज (साेमवार) सकाळपासून ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची ये-जा सुरु हाेती. (satara-marathi-news-covaxin-vaccine-available-karad-mahableshwar-patan-dhaiwadi)

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर ते वेगाने सुरू होते. एकाच दिवसात 30 हजार नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याला लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहिमेला खीळ बसल्याचे दिसून येत होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून लशीचा साठा आवश्‍यक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने टप्प्याटप्प्याने लसीकरणास सुरुवात झाली आहे. दरम्यान, "कोव्हिशिल्ड'ची पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस 45 दिवसांनी, तर "कोव्हॅक्‍सिन'चा दुसरा डोस 28 दिवसांनी दिला जात होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून "कोव्हिशिल्ड'च्या दुसऱ्या डोसची मुदत वाढवत 84 दिवस केली तर, "कोव्हॅक्‍सिन'च्या दुसऱ्या डोसचा कालावधी 28 ते 45 दिवसांदरम्यान ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, सध्या "कोव्हॅक्‍सिन' घेतलेल्या नागरिकांची मुदत संपत आल्याने दुसरा डोस देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: 'कुटुंबांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू'

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 7 लाख 50 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असून एकूण 37 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे एक मे रोजी लसीकरणास सुरुवात झाली. मात्र, लशींची कमी प्रमाणात उपलब्धता व पहिला डोस घेणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे 10 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्णत: बंद करण्यात आले होते. मात्र, आता "कोव्हॅक्‍सिन' घेतलेल्या नागरिकांची पहिल्या डोसची मुदत संपत आल्याने दुसरा डोस सुरू करण्यात आला आहे. आत्तापर्यंत "कोव्हॅक्‍सिन'चा दुसरा डोस जिल्ह्यात केवळ 192 नागरिकांनी घेतला आहे. सध्या लस उपलब्ध झाल्याने नागरिक "कोव्हॅक्‍सिन'चा दुसरा डोस घेण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.

हेही वाचा: आत्महत्या रोखूया, चला बांधू मानसमैत्रीचे पूल

दहा लाख नागरिक पहिला डोस प्रतीक्षेत

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील केवळ 16 हजार 522 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे 11 लाख आहे. त्यामुळे 10 लाख 83 हजारांहून अधिक नागरिक अजूनही लसीकरणाच्या प्रतीक्षेत असून, या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे.

...येथे मिळणार "कोव्हॅक्‍सिन'चा दुसरा डोस

जिल्ह्यात "कोव्हॅक्‍सिन'चा डोस केवळ जिल्हा रुग्णालय, कऱ्हाड, पाटण, फलटण, कोरेगाव, दहिवडी, मेढा, वाई, महाबळेश्‍वर या उपजिल्हा रुग्णालयांत, तर खटाव, शिरवळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुरू राहणार आहे.

हेही वाचा: चर्चाच चर्चा! पोलिस पाटलाच्या लग्नापुर्वीच्या कृतीचे चर्चा

ब्लाॅग वाचा