नवरात्रोत्सवात प्लाझ्मा बॅंक उभारण्याचा निर्णय, तरुणांचा पुढाकार

केशव कचरे
Monday, 12 October 2020

डिस्कळसह परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी या सर्व गावांतील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळांनी यावर्षी दुर्गामूर्तीची स्थापना न करता डिस्कळ आणि परिसरातील जे कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, त्यांची अँटीबॉडीज टेस्ट करून ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार असतील, अशा लोकांचा प्लाझ्मा घेऊन त्याची प्लाझ्मा बॅंक तयार करण्याचा व गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बुध (जि. सातारा) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्रोत्सव साजरा न करता उत्सवासाठीचा निधी कोरोना रुग्णांसाठी वापरण्याचा व कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा बॅंक स्थापन करण्याचा निर्णय डिस्कळ पंचक्रोशीतील नवरात्रोत्सव मंडळांनी घेतला आहे. 

पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या अध्यक्षतेखाली डिस्कळ येथे गारवडी, मोळ, मांजरवाडी, अनपटवाडी, काळेवाडी येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात डिस्कळसह परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी या सर्व गावांतील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळांनी यावर्षी दुर्गामूर्तीची स्थापना न करता डिस्कळ आणि परिसरातील जे कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, त्यांची अँटीबॉडीज टेस्ट करून ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार असतील, अशा लोकांचा प्लाझ्मा घेऊन त्याची प्लाझ्मा बॅंक तयार करण्याचा व गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

खातेदार, ग्राहकांना पेमेंटब्रिज सिस्टिम उपयुक्त ठरणार : चेतना सिन्हा 

सर्व मंडळांच्या निर्णयाचे मनस्वी स्वागत करून श्री. घोडके यांनी कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सामाजिक अंतर राखून झालेल्या या बैठकीस सरपंच डॉ. महेश पवार, राजू कर्णे, हंबीरराव कदम, पोलिस पाटील संदीप कर्णे, सागर मदने, पोलिस कर्मचारी सचिन जगतापसह गावोगावच्या मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करताच त्याला प्रतिसाद देत बैठकीस उपस्थित असलेल्या दत्ता घनवट यांनी लगेच प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment Of Plasma Bank To Save The Lives Of Patients At Diskal Satara News

फोटो गॅलरी