#TuesdayMotivation : शेतीपासून दूर नको गं बाई!

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 25 February 2020

‘श्रमप्रतिष्ठेची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न’
‘रयत’चे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अपेक्षित असलेली ‘कमवा व शिका’ ही योजना सुरुवातीपासून आवटे महाविद्यालयात राबविली जात आहे. यात ३२ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्रतितास ४० रुपये याप्रमाणे विद्यार्थ्यांना मोबदला दिला जातो. या पैशातून विद्यार्थी खर्च भागवतात. यातून श्रमाची प्रतिष्ठा जपण्याची मूल्ये रुजविली जात आहेत, असे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

मंचर - चार बुकं शिकलेले शेती म्हटलं की नाकं मुरडतात, मुली तर शेतीपासून चार हात दूरच असतात. पण, रयत शिक्षण संस्थेच्या येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील १२ विद्यार्थिनींनी ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत शेतीस प्राधान्य देत ४५ गुंठ्यांतून सात टन बटाट्याचं उत्पादन घेतलं आहे. लागवडीपासून काढणीपर्यंतची सर्व कामं मुलींनीच केली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

मंचर (ता. आंबेगाव) येथील आवटे महाविद्यालयाच्या मालकीची एकूण १०५ एकर जमीन असून, तीन पाण्याचे तलाव व फळबाग आहे. प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, अधीक्षक प्रभाकर पारधी यांनी पुढाकार घेत डोंगर उतार व माळरानाच्या सहा एकर जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने मशागत केली. ‘कमवा व शिका’ योजनेतील मनीषा लोहकरे, जयश्री मेमाणे, रूपाली आढळ, जिजा मेठल, स्नेहल आढारी, आरती आढारी, सोनाली भोकटे, सुनीता इष्टे, मनीषा पढर, सुषमा पेकारी, लीला आढारी, अश्विनी तळपे या विद्यार्थिनींनी बटाटा व कांदा लागवडीचा प्रस्ताव दिला. त्यास डॉ. गायकवाड यांनी मान्यता दिली. 

पुणेकरांना आता जंगलाचा राजा बघायला मिळणार 

सुरुवातीला ट्रॅक्‍टरच्या साह्याने जमिनीची नांगरट केली. सरी पद्धतीने नऊ क्विंटल बटाटा वाणाची ४५ गुंठ्यांत लागवड केली. लागवड, खुरपणी, खत टाकणे ही सर्व कामे मुलींनीच केली. बटाट्याची नुकतीच काढणी करण्यात आली असून, सात टन उत्पादन झाले आहे. एक बटाटा पाऊण ते अर्धा किलो वजनाचा भरत आहे. या बटाट्यास ११ रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव मिळाला आहे.

पुरंदर विमानतळ ठरणार फायदेशीर; दर वर्षी येतील 'इतके' प्रवासी!

बटाटा उत्पादनासाठी ५७ हजार रुपये खर्च आला असून, खर्च वजा जाता १९ हजार ७०० रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी यामुळे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. विद्यार्थिनींना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farming Girl Student Potato Production Motivation