esakal | विशेष मुलांसाठी "इनरव्हील'तर्फे 18 बूट; पालकांत समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांसाठी "इनरव्हील'तर्फे 18 बूट; पालकांत समाधान

जन्मतः असणाऱ्या या क्‍लब फूट अर्थात विशेष मुलांचे पालक अतिशय नाराज आणि चिंतेत असतात. अशा वेळेस शासन व इनरव्हीलसारख्या सामाजिक संस्था मदत करतात.

विशेष मुलांसाठी "इनरव्हील'तर्फे 18 बूट; पालकांत समाधान

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : इनरव्हील क्‍लबच्या वतीने सातारा जिल्ह्यातील क्‍लब फूट अर्थात विशेष मुलांसाठी 18 बूट नुकतेच भेट देऊन संबंधित छोट्या छोट्या बालकांचे पाय सरळ करण्यात योगदान दिले. त्यामुळे विशेष मुलांच्या पालकांत समाधान व्यक्त होत आहे. 

इनरव्हील क्‍लब सातारा कॅम्प, सातारा, ठाणे नॉर्थ इंड आणि कोरेगाव या चार क्‍लबच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी क्‍युअर इंटरनॅशनल ट्रस्टच्या सातारा जिल्हा समन्वयक मयुरा गायकवाड यांच्याकडे हे 18 बूट भेट देण्यात आले. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात अशा सर्व विशेष मुलांवर उपचार केले जातात. जन्मतः असणाऱ्या या क्‍लब फूट अर्थात विशेष मुलांचे पालक अतिशय नाराज आणि चिंतेत असतात. अशा वेळेस शासन व इनरव्हीलसारख्या सामाजिक संस्था मदत करतात. त्यातून या पालकांना दिलासा मिळतो. मयुरा गायकवाड यांनी क्‍लब फूट अर्थात विशेष मुलांचे पाय सरळ करण्याकामी इनरव्हील क्‍लबचे नेहमी सहकार्य असते, याबाबत समाधान व्यक्त केले. 

यावेळी इनरव्हील डिस्ट्रिक्‍ट 313 च्या माजी अध्यक्षा गीता मामणिया, इनरव्हील क्‍लब सातारा कॅम्पच्या अध्यक्ष प्रज्ञा माने, आशा जाधव, स्मिता भोसले, इनरव्हील क्‍लब साताराच्या अध्यक्षा मदिना पटेल, ईस्माईल पटेल, इनरव्हील क्‍लब ठाणे नॉर्थ एंडच्या अध्यक्षा वेदश्री रेगे, अवधूत रेगे, इनरव्हील क्‍लब कोरेगावच्या अध्यक्षा रोहिणी बर्गे, नलिनी बर्गे, संजीवनी मोरे, सुनीता मोरे उपस्थित होत्या. 

आंब्याच्या झाडाखाली बसून उदयनराजेंचे भीक मागो आंदोलन; Lockdown ला खासदारांचा तीव्र विरोध

संभाजीराजेंच्या बलिदानानंतर रायगड 1689 मध्ये मोगलांच्या ताब्यात; कसा सोडविला खंडेरावांनी गड वाचा सविस्तर.. 

वाई, महाबळेश्‍वरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 67 हजारांचा दंड वसूल

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर 

loading image
go to top