.. अन्‌ ती विसावली कुशीत

रविकांत बेलोशे 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

बांधकाम व्यावसायिक आबा पाटील यांच्या चाणाक्ष नजरेत बस स्थानकाजवळ एक चिमुकली दृष्टीस पडली. ते दृश्‍य पाहून त्यांच्या मनात पाल चुकचुकली. चांगल्या कपड्यातील मुलगी एका भिकाऱ्याच्या जवळ का बसली असेल? हा प्रश्‍न त्यांना पडल्याने त्यांनी धाडसाने तिला जवळ जाऊन नाव विचारले, तेव्ही ते गांगरली होती.

भिलार (जि. सातारा) : पाचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्र व नावाजलेल्या पर्यंटनस्थळावरील पर्यटकांच्या गर्दीत कामासाठी आलेल्या दाम्पत्याची चिमुकली हरवली. त्यामुळे संबंधित दाम्पत्य हादरुनच गेले. मात्र, एका बांधकाम व्यावसायिकाच्या चाणाक्षपणामुळे आणि दक्ष स्थानिक युवकांच्या सतर्कतेने ती मुलगी काही तासांतच पालकांच्या कुशीत विसावली. ही गोष्ट नाही तर घडलेली घटना आहे. सर्वांनाच पाचगणी सुरक्षित आणि दक्ष असल्याची भावना जागृत करणारी आहे. 

 

हे वाचा : गाढवांचा बंदाेबस्त करा ; राऊत, आव्हांडावर सातारकरांचा हल्लाबाेल

बांधकाम व्यावसायिक आबा पाटील यांच्या चाणाक्ष नजरेत बस स्थानकाजवळ एक चिमुकली दृष्टीस पडली. ते दृश्‍य पाहून त्यांच्या मनात पाल चुकचुकली. चांगल्या कपड्यातील मुलगी एका भिकाऱ्याच्या जवळ का बसली असेल? हा प्रश्‍न त्यांना पडल्याने त्यांनी धाडसाने तिला जवळ जाऊन नाव विचारले, तेव्ही ते गांगरली होती. ती वडिलांचे नाव सांगू लागली. तिचे नाव सांगत नव्हती. पाटील यांना थोडी शंका आल्याने त्यांनी पाचगणीचे नगरसेवक पृथ्वीराज कासुर्डे व सामाजिक कार्यकर्ते निहाल बागवान यांना त्याची माहिती दिली. तोपर्यंत बागवान आणि कासुर्डे हे त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन बस स्थानकाशेजारी आले. 

हेही वाचा : जनतेने पराभव केला तरीही उदयनराजेंना प्रजातंत्र समजेना : जितेंद्र आव्हाड

कसलीही माहिती मिळत नसल्याने बागवान यांनी लगेच मुलीचा फोटो व वर्णन पाचगणीतील सर्व व्हॉट्‌सऍपग्रुपवर पाठवले. ही माहिती मिळताच हवालदार प्रवीण महांगडे तेथे दाखल झाले. त्यानंतर सर्वत्र माहिती गेल्याने चर्चा सुरू झाल्या. पण, या धांदलीत मुलीचे आई-वडील मुलगी हरवली म्हणून पोलिस ठाण्यात पोचले होते. युवक आणि सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्याशी संपर्क झाला. त्यानंतर मुलगी घेऊन सर्वजण पोलिस ठाण्यात आले आणि हरवलेली मुलगी धावतच आईच्या कुशीत विसावली. भेदरलेली मुलगीही आनंदाने आईच्या कुशीत मुसमुसत होती. या प्रकाराने उपस्थित सर्वजण भारावून गेले. 

आणखी वाचा : Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग

दोन-तीन दिवसांपूर्वी हे दाम्पत्य पाचगणीतील एका हॉटेलात नोकरीला आले आहे. आई-वडिलांच्या अपरोक्ष ही चिमुकली बस स्थानकाकडे चालत गेली होती. पण, पाचगणीकरांच्या मदतीने ही मुलगी सापडल्याने पालकांनाही हायसे वाटले. त्यांनी अजूनही माणुसकी जिवंत असल्याची भावना व्यक्त केली. आबा पाटील, श्री. बागवान, नगरसेवक कासुर्डे, हवालदार महांगडे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchgani Police Returned Missing Child Girl To Mother