
पुरग्रस्तांसाठी काँग्रेसचा एक हात मदतीचा
कऱ्हाड : जिल्हा काँगेसतर्फे (Congress) पूरग्रस्तांना एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. त्या उपक्रमाव्दारे काँगेस (Congress) तुमच्यासोबत आहे, अशाच संदेश त्यांच्या पर्यंत पोचवला आहे. त्या उपक्रमाव्दारे काले येथील १७० कुटुंबांना माजी मुख्यमंत्री आमदार (MLA) पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या हस्ते मदत देण्यात आली.
यावेळी काँग्रसचे सरचिटणीस व जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, काँग्रसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा.धनाजी काटकर, जिल्हा काँगेसचे सरचिटणीस नानासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, नितीन थोरात, देवदास माने, काकासाहेब पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, साहेबराव पाटील,विकास पाटील, काले टेक उपसरपंच अजित यादव, जयकर खुडे, संदीप यादव, प्रा.के. एन. देसाई, शशिकांत यादव, युवराज दळवी,अरुण पाटील, शंकर यादव,माणिक यादव, भगवान यादव, विलास यादव उपस्थित होते.
हेही वाचा: शिवसेनेचे अनेक नाराज आमदार माझ्या संपर्कात - राणेंचा खुलासा
आमदार चव्हाण म्हणाले, तालुक्यातील दक्षिण मांड नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबांना फटका बसला. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. त्याचे संसार पुन्हा उभे राहावेत यासाठी काँगेस पक्षाच्या वतीने मदतीचा खारीचा वाटा त्यांना देऊ केला आहे. अशा अडीअडचणींना काँगेस पक्ष नेहमी पाठीशी राहील.जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या नुकसानीचा शासनाकडे पाठपुरावा तातडीने करण्यात आला. सरकारने पूरग्रस्तांच्या अडीअडचणी विचारता घेऊन कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकार नेहमीच पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे.
त्याचबरोबर काँगेस पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. संसार उपयोगी साहित्य देऊन पक्षाच्या वतीने मदत केली जात आहे. कऱ्हाड दक्षिण विभागातील नुकसानीसाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरच कामे सुरू होतील अशी ग्वाही त्यांनी दिली. पूरग्रस्त कुटुंबांना दोन ताटे, कढई, चमचे, वाटी यासह संसार उपयोगी साहित्य पूरग्रस्तांना देण्यात आले. काँगेसच्या कमिटीवरील निवडीबद्दल आमदार चव्हाण यांच्यासह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा नानासाहेब पाटील मित्र परिवार व ग्रामस्थांतर्फे सत्कार झाला. यावेळी मनोहर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिक पाटील यांनी प्रास्ताविक केले. सतीश चव्हाण यांनी आभार मानले.
Web Title: Prithviraj Chavan Distributed Aid To 170 Families In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..