#ThursdayMotivation: चेंबूरमधील जिद्दी तरुणाची ‘इस्रो’ भरारी

जीवन तांबे 
Thursday, 7 November 2019

चेंबूर - जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना आयुष्यात उच्च पदावर जाण्याच्या जिद्दीने निव्वळ मेहनतीच्या जोरावर चेंबूरमधील तरुणाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) केंद्रापर्यंत झेप घेतली आहे. तिथे तो सध्या तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. राहुल घोडके असे त्याचे नाव असून आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चार घरची धुणीभांडी करून झटणाऱ्या मातेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्याने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

चेंबूरमधील मारवली चर्च परिसरातील नालंदा नगरात एका झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या घरात राहुल राहतो. त्याने आपले शिक्षण चेंबूरमधील जवाहर विद्यालयात पूर्ण केले. दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला; पण त्याच वर्षी मजुरीचे काम करणाऱ्या वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. तिने उदरनिर्वाहासाठी परिसरातील इमारतींत धुणीभांडी व कॅटरर्सचे काम सुरू केले. आईला व बहिणीच्या शिक्षणाकरिता मदत करीत होता; परंतु दोन वर्षांपासून तो पुस्तके आणि अभ्यासाशिवाय वावरत होता. त्याने शिक्षणाची ओढ सोडली नव्हती. गोवंडी आयटीआय कार्यालयात जाऊन दहावीमध्ये मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या जोरावर २०१२ मध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

शेतकऱ्याचा मुलगा झाला "आयईएस"

खूप मेहनत घेऊन त्याने त्या ट्रेंडमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांतर माटुंग्यातील व्हीजेटीआयमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिप्लोमाला दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. त्यातही प्रथम श्रेणी प्राप्त केली. व्हीजेटीआय महाविद्यालयात शिकत असताना त्याला एका कंपनीत नोकरीची संधी चालून आली. तिथे सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करीत असताना ‘इस्रो’मध्ये भरती होण्याची इच्छा मनाशी ठेवून तो परीक्षेच्या तयारीला लागला. काही दिवसांतच परीक्षा दिली. देशभरातील विविध राज्यांतील एकूण १५ हजारपेक्षा अधिक मुलांनी अर्ज दाखल करून परीक्षा दिली होती. त्यात राहुल मागासवर्गीय गटातून तिसरा आला. खुल्या गटात त्याने १६ वा क्रमांक पटकावला. ‘घरोघरी धुणीभांडी करून राहुलला शिकवले. त्याची इस्रोमध्ये निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया त्याच्या आईने दिली.

आईने घरकाम करून आम्हाला शिकविले. खूप कष्ट घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो, याचा मला खूप आनंद आहे. अशीच मेहनत प्रत्येकाने घेऊन जिद्दीने अभ्यास केला, तर यशोशिखर दूर नाही.
- राहुल घोडके

गरज ओळखा आणि यशस्वी व्हा!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Ghodke is the inspiration for young people

Tags
टॉपिकस
Topic Tags: